मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा छगन भुजबळांना झटका, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेताच एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कामाचा सपाटा लावला असून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री होताच राष्ट्रवादीचे नेते व नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांना झटका दिला आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे जिल्हा नियोजन कार्यसमितीच्या बैठकीत प्रशासकिय मंजूरी देण्यात आलेल्या कोट्यवधींच्या निधी वाटपाला एकनाथ शिंदेंनी स्थगिती दिली आहे.

घाईघाईत मंजूरी कशासाठी असा सवाल उपस्थित करत शिंदेंनी जवळपास 568 कोटींच्या कामाला ब्रेक दिला आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.

सुहास कांदे यांनी या तक्रारीची दखल घेत थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन केले व या निधी वाटपाला स्थगिती दिली आहे. राज्यात इतक्या राजकीय घडामोडी घडत असताना तुम्ही अशी बैठक घेतलीच कशी?, असा सवाल देखील एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला आहे.

कोणत्याही विभागाच्या निधीचं वाटप झालं नाही. केवळ कोणत्या विभागाला किती निधी द्यायचा याचा आढावा घेण्यात आला, अशी माहिती जिल्हाधिकारी डी. गंगाधरन यांनी दिली आहे.

मंत्रिमंडळ निश्चित होण्यापूर्वीच एकनाथ शिंदेंनी कामाचा सपाचा लावला आहे. एकनाथ शिंदेंनी निधी वाटपाचा निर्णय रद्द करत छगन भुजबळांना मोठा धक्का दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

“फडणवीसांच्या नावामागे ‘उप’ शब्द लावायला फार जड जातं”

संजय राऊतांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ

मोठी बातमी! महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शरद पवारांना दुसरा झटका

बंडखोर आमदारांनी मुक्काम ठोकलेल्या गुवाहाटीच्या हॉटेलचं एकूण बिल किती?, आकडा वाचून थक्क व्हाल