मुंबई | गेल्या तीन आठवड्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप कायम आहे. अद्यापही कर्मचाऱ्यांच्या मागणीवर तोडगा निघालेला नाही. अशातच आता एसटी संपावर तोडगा निघत नसल्यानं आता आझाद मैदानातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा जोर वाढवला आहे.
एसटी महामंडळाचं विलीणीकरण राज्यशासनात करत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. तयामुळे हा संप आणखीनच चिघळत चाललं आहे.
आजही एसटी कर्मचाऱ्यांच्या तिढा कायम आहे. त्यामुळे राज्यातील प्रवाशांची चांगलीच कोंडी होत आहे. राज्य सरकारकडून वारंवार संप मागे घेण्यास सांगितला जात आहे. मात्र कर्मचाऱ्यांनी अद्याप काही हा संप मागे घेतलेला नाही.
ऐन दिवाळीच्या मुहुर्तावरच कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारल्यामुळे सणासुदीच्या काळातच प्रवाशांची कोंडी पहायला मिळाली. आता हे आंदोलन जास्तच तीव्र होताना दिसत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्यासाठी राज्य सरकारनं त्यांना अल्टीमेट दिला होता. मात्र संप काही थांबला नाही. अशातच आता राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला असून राज्य सरकारने तब्बल 297 कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं आहे.
अनेकवेळा संप मागे मागे घेण्याचं आवाहन करुनही कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नाही. अनेक प्रयत्न करूनही एसटी कर्मचारी संप मागे घेत नसल्यानं राज्य सरकारनं आता आक्रमक पवित्रा घेत निलंबन करण्यास सुरुवात केली आहे.
एसटीतील 238 कर्मचार्यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने उर्वरित कर्मचार्यांवरही सेवा समाप्तीची कारवाई सुरू राहणार आहे.
दरम्यान, एसटी संप हा दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारनं कारवाई करुनही कर्मचारी संप मागे घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पुढील तीन दिवस ‘या’ भागात पावसाळी वातावरण, हवामान खात्याचा इशारा
“पंतप्रधान मोदी येणार, त्यामुळे तीन दिवस बाल्कनीत कपडे वाळत घालू नका”
इतिहास घडला! कमला हॅरिस बनल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष
पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, वाचा आजचे ताजे दर
समीर वानखेडेंचा मुंबईत रेस्ट्रो बार, फोटो शेअर करत नवाब मलिकांचा गौप्यस्फोट