कोरोनाच्या संकटात अजय देवगननं सिनेकामगारांना दिली मोठी रक्कम

मुंबई |  कोरोना व्हायरसच्या रूपाने देशावर मोठं संकट आलेलं आहे. या संकटाच्या काळात अनेक दानशूर व्यक्ती मदतीचा हाच देत आहे. अभिनेता अजय देवगन यानेही आपली सामाजिक जबाबदारी ओळखून एक पाऊल पुढे टाकलं आहे.

अजय देवगन याने कोरोना व्हायरसच्या या भयान संकटात फेडरेशन ऑफ वेस्टर्न युनियनच्या सिनेकामगारांना 51 लाखांची मदत दिली आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न युनियनचे चीफ अ‌ॅडव्हायझर अशोक पंडित यांनी एक व्हीडिओ जारी करत यासंबंधी माहिती दिली आहे.

प्रिय अजय देवगन आपण दिलेल्या 51 लाखांच्या मदतीबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. आपण नेहमीच संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे केला आहे. खास करून कठीण परिस्थितीत आपण आपलं सिंघमचं रूप दाखवून देता, असं अशोक पंडित यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हीडिओमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अजय देवगन यांनी दिलेली मदत आम्ही टेक्निशियन, वेगवेगळ्या क्राफ्टसमध्ये काम करणारी लोकं यांना देणार असल्याचं अशोक पंडित यांनी सांगितलं आहे. तसंच या काळात अजयप्रमाणेच रोहित शेट्टी यानेदेखील फेडरेशनला 51 लाख रूपयांची मदत केली आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या –

-“आता 5 मिनिटाच्या आत कोरोना तपासणीचा रिझल्ट कळू शकणार”

-क्वारंटाईन टाईम म्हणत ‘या’ अभिनेता-अभिनेत्रीनं बेडरुमधले फोटो सोशल मीडियावर टाकले

-“साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो की या रुग्णालयाची गरज कुणालाच लागू नये”

-“अल्लाहने आजार दिला असेल तर कुठलाही डाॅक्टर किंवा औषध आपल्याला वाचवू शकणार नाही”

-लॉकडाऊन संपल्यानंतर नागरिकांनी लगेच घराबाहेर पडू नये- पंतप्रधान मोदी