राज्यात एकाच दिवशी तब्बल 81 रूग्ण वाढले; पाहा कोणत्या शहरात किती रूग्ण वाढले…

मुंबई |  राज्यात कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा वाढत चाललेला आहे. आज राज्यात 81 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या 416 वर जाऊन पोहचली आहे.

नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे 57, पुण्याचे 6, पिंपरी चिंचवडचे 6, बुलढाणा 1, ठाणे 5, नगर 9,वसई आणि हिंगोलीमधल्या एकाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 416 वर पोहोचली आहे.

मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली, अहमदनगर, बुलडाणा या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यात दोन, तर बुलडाण्यात एकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.  तर राज्यात आतापर्यंत 17 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषीत केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून २३०५ खाटा कोरोनाबाधीतांच्या उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –

-कोरोनाच्या संकटात अजय देवगननं सिनेकामगारांना दिली मोठी रक्कम

-“आता 5 मिनिटाच्या आत कोरोना तपासणीचा रिझल्ट कळू शकणार”

-क्वारंटाईन टाईम म्हणत ‘या’ अभिनेता-अभिनेत्रीनं बेडरुमधले फोटो सोशल मीडियावर टाकले

-“साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो की या रुग्णालयाची गरज कुणालाच लागू नये”

-“अल्लाहने आजार दिला असेल तर कुठलाही डाॅक्टर किंवा औषध आपल्याला वाचवू शकणार नाही”