गोविंदा-अभिषेकच्या ‘त्या’ वादात आरतीची उडी, म्हणाली लहान असताना…

मुंबई | बॉलीवूड इंडस्ट्रीतील अनेकजण एकमेकांवर सतत आरोप प्रत्यारोप करताना दिसत असतात. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा आणि कृष्णा  अभिषेक या दोघांमध्ये देखील वाद चालू आहेत. हे मामा-भाचे सतत कोणत्या न कोणत्या कारणांवरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना पहायला मिळतात.

ते दोघे एकमेकांना सारखे टोचून बोलत असतात. दोघे एकमेकांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत असतात. अशातच आता या दोघांच्या वादात गोविंदाची भाची आरती सिंग हिने उडी घेतली आहे. आरतीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

तीने इन्स्टाग्रामवर तिच्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. माझ्यातली लहान मुलगी अजूनही जिवंत आहे, असं कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. तिने पुढे म्हटले आहे की, माझ्या अपरिपक्वतेचा स्विकार केल्याबद्दल धन्यवाद. मी अचानक लहान मुलांसारखी वागू लागते.

त्यावेळी माझ्या आसपासचे लोकही लहान झाल्यासारखे वाटतात. कृपया असे रागवू नका माझ्यावर प्रेम करा, असा कॅप्शन तिने या फोटोवर दिला आहे. तिने कॅप्शन मधून अप्रत्यक्षपणे गोविंदा आणि कृष्णा अभिषेकचे कान टोचले आहेत.

गेली पाच वर्षे गोविंद आणि कृष्णा अभिषेक यांच्यात तणावाचं वातावरण आहे. नुकतंच ‘द कपिल शर्मा शो’च्या दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये गोविंदाने हजेरी लावली होती. मात्र, कृष्णा अभिषेक त्यावेळी शोमध्ये दिसला नाही.

तसेच गोविंदानेही शोमध्ये कृष्णाचे नाव न घेता त्याला टोला लगावला होता. त्यामुळे त्यांच्या नात्यात आणखीनच दुरावा निर्माण झाल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

गोविंदा आणि कृष्णाच्या नात्यात वाद निर्माण होण्याची अनेक कारणे आहेत. 2018 साली कृष्णाच्या पत्नीने एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट गोविंदाची पत्नी सुनीता यांनी वाचली आणि ही पोस्टच त्यांच्या वादास कारणीभूत ठरली.

कृष्णाने यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, ही पोस्ट त्याची बहिण आरती सिंहसाठी लिहिली होती. मात्र, गोविंदा आणि त्याच्या पत्नीचे म्हणणे होते की हे त्यांच्यासाठीच लिहिण्यात आली होती. कृष्णाने त्यानंतरही अनेकवेळा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते समजून घेण्यास तयार नव्हते.

महत्त्वाच्या बातम्या-

कौतुकास्पद! नेहा कक्करने ‘या’ स्पर्धेकाला केली 1 लाखाची मदत कारण…

कंगनाचे मनालीतील घर पाहून तुम्हीही थक्क व्हाल! पहा कंगनाचे 20 कोटीचे घर आहे तरी कसं?

अंकिताचा बॉयफ्रेंड सोबतचा ‘तो’ व्हिडिओ पाहून सुशांतचे चाहते संतापले; पहा व्हिडिओ

आमिरची मुलगी ईरा अडकली ‘या’ व्यक्तीच्या प्रेमात, दोघांची जोडी पाहून चाहते बोलले…

चित्रपट सृष्टी सोडत राजकारणात आलेल्या ‘या’ अभिनेत्रीचा नवरा आहे तिच्यापेक्षा 9 वर्षाने लहान; वाचा सविस्तर