कौतुकास्पद! नेहा कक्करने ‘या’ स्पर्धेकाला केली 1 लाखाची मदत कारण…

मुंबई | प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर नेहमीच आपल्या गाण्याने लोकांची मनं जिंकत असते. काही दिवसांपूर्वीच नेहा विवाहबंधनात अडकली आहे. नेहा एक सुंदर गायिका आहे आणि तीने तिचा पार्टनर पण तसाच शोधला आहे. पंजाबी गायक रोहन प्रित सिंग याच्याबरोबर आॅक्टोबर महिन्यात नेहाने लग्न केलं आहे.

नेहा रोहनप्रीत बरोबर हनिमूनसाठी दुबईमध्ये गेली होती. नेहा आणि रोहनप्रीत दुबईमध्ये भरपूर एन्जोय करत होते. या दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी दुबईमधून अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. नेहा आणि रोहनप्रीतची जोडी चाहत्यांना देखील भरपूर आवडत आहे. चाहते त्यांच्या फोटोला भरभरून प्रेम देत आहेत.

सर्वांनाच माहीत आहे की, नेहाने आयुष्यात प्रचंड स्ट्रगल केलं आहे. ती गाने गाऊन मिळालेल्या पैशातून आपल्या कुटुंबाला मदत करायची. आज ती देशातील लोकप्रिय गायकांपैकी एक आहे. यशाच्या शिखरावर पोहोचूनही नेहा नेहमी सर्वसामान्य माणसांना मदत करत असते.

नेहा आता पुन्हा एकदा ‘इंडियन आयडल १२’ मध्ये जज म्हणून दिसणार आहे. या शोमध्ये नेहाने एका स्पर्धकाला १ लाख रुपयांची मदत केली असल्याचं आता समोर आलं आहे.

सोनी वाहिनीने यासंबंधीचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात स्पर्धक शहजाद अली त्याची कहाणी सांगत आहे. मुंबईत येऊन ‘इंडियन आयडल’मध्ये भाग घेता यावा म्हणून आजीने 5 हजार रुपयांचं कर्ज घेतल्याचं शहजादने यावेळी सांगितलं आहे.

त्याचं स्ट्रगल ऐकल्यावर नेहाला तीने केलेल स्ट्रगल आठवते. म्हणून शहजादच्या आजीसाठी आणि त्याच्या मेहनतीसाठी नेहाने त्याला एक लाख रुपयांची मदत केली आहे.

यासोबत संगीतकार विशाल दादलानीही शहजादला उत्तम गुरू देण्याचं वचन देतो. नेहाने पैशांची मदत देऊ केली तर विशालने शहजादला प्रशिक्षणासाठी चांगल शिक्षण देण्याविषयी वचन दिलं आहे.

दरम्यान, शहजाद जयपूरमध्ये कपड्यांच्या छोट्या दुकानात काम करतो. लहान वयात आईच्या निध.नानंतर आजीने त्याला लहानाचं मोठं केलं. त्याच्या आजीला काहीतरी होऊन दाखवन्यासाठी तो खुप मेहनत करत आहे. आई नसल्यामुळे आजीलाच आई मानून तीच स्वप्न पुर्ण करण्याची त्याची ती धडपड पाहून नेहाने त्याला मदत केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कंगनाचे मनालीतील घर पाहून तुम्हीही थक्क व्हाल! पहा कंगनाचे 20 कोटीचे घर आहे तरी कसं?

अंकिताचा बॉयफ्रेंड सोबतचा ‘तो’ व्हिडिओ पाहून सुशांतचे चाहते संतापले; पहा व्हिडिओ

आमिरची मुलगी ईरा अडकली ‘या’ व्यक्तीच्या प्रेमात, दोघांची जोडी पाहून चाहते बोलले…

चित्रपट सृष्टी सोडत राजकारणात आलेल्या ‘या’ अभिनेत्रीचा नवरा आहे तिच्यापेक्षा 9 वर्षाने लहान; वाचा सविस्तर

जॅकलीनने शेअर केलेल्या ‘त्या’ बोल्ड फोटोमुळे चाहत्यांनी केलं प्रचंड टोल!