अभिनेत्री आलिया भट्टला कोरोनाची लागण!

मुंबई| महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी, क्रिकेटपटू, राजकीय क्षेत्रातील मंडळींना कोरोनाची लागण होत आहे. . आता अभिनेत्री आलिया भट्टला देखील कोरोनाची लागण झाली आहे.

आलियाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी पोस्ट करत करोना चाचणी पाझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे. ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. तुम्ही देखील तुमची काळजी घ्या आणि सुरक्षित रहा’ या आशयाची पोस्ट तिने शेअर केली आहे.

काही दिवसांपूर्वी आलियाचा बाॅयफ्रेंड रणबीर कपूरलाही कोरोनाची लागण झाली होती. त्याचबरोबर आर माधवन, विक्रांत मेसी, संजय लीला भंसाळी, मनोज बाजपेयी, कार्तिक आर्यन, परेश रावल यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी कोरोनाबाधित झाले आहेत.

रणबीर बरा झाल्यानंतर आलिया रणबीरसोबत जुहू येथे दिसली होती. रणबीर आणि आलिया ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात प्रथमच एकत्र दिसणार आहेत. आलिया आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून या चित्रपटाबद्दलच्या पोस्ट्स कायम शेअर करत असते.

दरम्यान, आलिया भट्ट सध्या तिच्या तीन आगामी चित्रपटांच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. यात दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा ‘आरआरआर’ चित्रपट, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ या दोन चित्रपटामुळे ती चांगलीच चर्चेत आहे. या शिवाय ती रणबीर कपूरसोबत ब्रह्मास्त्र या चित्रपटातही दिसणार आहे.

काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तरी देखील कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाहीये. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 40 हजार पार गेला आहे. गुरुवारी 43183 नवीन रुग्णांची नोंद झाली. यानंतर राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 28,56,163 वर पोहोचला आहे.

महत्वाच्या बातम्या – 

‘…तर आम्ही पूर्णपणे कोलमडून पडू’; भरत…

राज्यात एकाच दिवशी 3 लाखांहून अधिक नागरिकांना कोरोना लस;…

कोरड्या त्वचेने हैरान? वापरा ‘हे’ घरगुती उपाय!

वाह रे पठ्ठ्या! 1 लाख रुपये किलोची भाजी पिकवणाऱ्या भारतातील…

भारताचे आभार माणणाऱ्या भूतानच्या ‘या’ चिमुरडीचा…