‘…तर आम्ही पूर्णपणे कोलमडून पडू’; भरत जाधवने मुख्यमंत्र्यांना केली ‘ही’ मागणी

मुंबई | गेल्या काही महिन्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतं आहे.

यासाठी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नाहीय.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे रूग्णांसाठी बेड्स आणि इतर सुविधा कमी पडू लागल्याचं दिसू लागलं आहे.याच पार्श्वभूमीवर कोरोना रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला काही निर्देश दिले आहे.

जर राज्यात लॉकडाऊन लागला तर पुन्हा मागिल वर्षीसारखा फटका सिनेसृष्टीला बसेल. अनेक अभिनेत्यांनी विवध माध्यमांतून मागणी केल्यानंतर सरकारने 50 टक्के क्षमतेने सिनामागृह सुरू करण्याला परवानगी दिली. असं असताना राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागला तर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नाट्यगृह आणि सिनेमागृह बंद करण्यात येतील, अशी चिंता कलाकारांना सतावरत आहे.

याच पार्श्वभूमीवर मराठी सिनेमासृष्टीतील अभिनेता भरत जाधव यांनी लॉकडाऊन न करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. लॉकडाऊन लागला तर आम्ही पूर्णपणे कोलमडून पडू, असंही त्यांनी म्हटलं आहे.

गेल्या वर्षभरात नाटक सुरू करण्यासाठी आम्ही सर्वस्व दिलं. आज सर्व उपाययोजना करून नाटक सुरू आहे. नाट्यक्षेत्राला गती येत असताना पुन्हा लॉकडाऊनचं संकट कोसळू नये. तसेच नाटक आज पुर्णपणे सावरलं नाही. अशातच पुन्हा घाव बसला तर त्याच्या होणाऱ्या भीषण परिणामांना तोंड द्यावं लागेल, आणि त्याचा थेट परिणाम आमच्या उपजीविकेवर होतो. त्यामुळे राज्य सरकारने नाट्यगृह बोलण्याचा निर्णय घेऊ नये ही कळकळीची विनंती, असं भरत जाधव यांनी म्हटलं आहे.

जर कोरोनाचा संसर्ग जास्त वाढला आणि लॉकडाऊन करावा लागला तर नाट्यक्षेत्राला यातून वगळावं, अशी विनंती आम्ही सर्व कलाकार जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकारे यांना करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्णांचा आकडा 40 हजारांच्या वर गेला आहे. गुरूवारी याच संख्येत 43 हजार 183 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा 28,56,163 वर पोहचला आहे.

महत्वाच्या बातम्या-

राज्यात एकाच दिवशी 3 लाखांहून अधिक नागरिकांना कोरोना लस;…

कोरड्या त्वचेने हैरान? वापरा ‘हे’ घरगुती उपाय!

वाह रे पठ्ठ्या! 1 लाख रुपये किलोची भाजी पिकवणाऱ्या भारतातील…

भारताचे आभार माणणाऱ्या भूतानच्या ‘या’ चिमुरडीचा…

खुशखबर! अखेर गॅस सिलिंडरचे दर उतरले, जाणून घ्या नवीन दर