‘द कपिल शर्मा शो’मधील अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, सोशल मीडियावर होतोय शुभेच्छांचा वर्षाव

मुंबई|  ‘द कपिल शर्मा शो’ मधील कलाकारांची विनोदबुद्धी प्रत्येकाला पोट धरून हासण्यास भाग पाडतेच. शोमधील कलाकारांची नावं आणि त्यांचं कौशल्य तर प्रेक्षकांच्या मनात आहे. कॉमेडियन सुगंधा मिश्रा 26 एप्रिलला अभिनेता तसेच विनोदी कलाकार संकेत भोसले याच्याशी लग्नबंधनात अडकली. 

अगदी थोडक्यात आणि साधेपणाने कोरोनाचे नियम पाळून हा लग्नसोहळा पार पडला. कोरोनामुळे लग्नाला काही जवळचे नातेवाईक उपस्थित होते. पारंपारिक रीतीरिवाजांनुसार विवाह सोहळा संपन्न झाला. सुगंधाच्या कुटुंबियांनी सोशल मीडियावर आधीच सांगितले होते की कोरोनामुळे हा सोहळा साध्या पद्धतीने होईल.

सध्या सुगंधा-संकेत यांच्या चाहत्यांकडून त्यांच्यावर भरभरुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सुगंधाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या मेहंदीचे फोटोज शेअर केले आहेत. शनिवारी तिच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. ‘मेहंदी की रात’ असं कॅप्शन तिने या फोटोला दिलंय.

सुगंधा मिश्राने गेल्या काही वर्षांत एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून तिची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. गानसमाज्ञी लता मंगेशकर यांची मिमिक्री तर ती खूपच छान करते. या मिमिक्रीसाठी तिला लता मंगेशकर यांच्याकडून देखील दाद मिळाली आहे. ती द कपिल शर्मा शो मध्ये देखील झळकली आहे.

डॉ. संकेत भोसले हा प्रसिद्ध कॉमेडियन असून संजय दत्तची मिमिक्री तो खूप चांगल्याप्रकारे करतो. तो व्यवसायाने डॉक्टर आहे. संकेत भोसले कॉमेडीयन असून ‘बाबा की चौकी’ हा त्याचा शो देखील अत्यंत लोकप्रिय आहे. या शोमध्ये तो अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची मुलाखत घेतो.

सुगंधा आणि संकेत अनेकदा एकत्र फिरताना, डिनर डेटला जाताना दिसले होते. पण त्यांनी कधीही त्यांच्या नात्यावर उघडपणे वक्तव्य केले नव्हते.

सुगंधा-संकेत दीर्घ काळ एकमेकांना डेट करत होते. मात्र दोघेही आपल्या नात्याबद्दल कधी मोकळेपणाने बोलले नाहीत. त्यांनी साखरपूडा केल्यानंतर सोशल मीडियावर फोटोशेअर करत नात्याला नवं नाव दिलं.

sughandha

 

महत्वाच्या बातम्या – 

‘कोरोना से डर नही लगता साहब, पंखे से लगता है’,…

सुशांतच्या बहिणीने शेअर केली ‘ती’ शेवटची पोस्ट,…

‘ब्रिटीश हवे होते अजून काही वर्ष…..’…

आणखी एका बाॅलिवूड अभिनेत्रीला कोरोनाची लागण, म्हणाली….

‘कोरोनाने माझा धडधाकट मित्र 15 दिवसांत…