मुंबई| बाॅलिवूड कलाकार सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेले पहायला मिळतात. ते आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधत असतात. आपले वेगवेगळे फोटो शेअर करत तर कधी व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. मात्र कलाकारांना अनेक ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.
अमायरा दस्तूर ही भारतीय सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अमायरानं नुकतच सोशल मीडियावर एक डान्स व्हिडीओ शेअर केला होता. मात्र काही नेटकऱ्यांनी अमायराच्या ड्रेसवरुन तिच्यावर टिका केलेली पहायला मिळाली.
अमायराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘डोंट रश’वर डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. तिचा डान्स पाहून अनेकांनी तिची प्रशंसा केली. व्हीडीओमद्ये तिने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि शॉर्ट पँट परिधान केली होती. तिचा हा आऊटफिट पाहून काही चाहत्यांनी तिला ट्रोल केले आहे.
‘म्हणून मुलींवर बलात्कार होतात. कारण सार्वजनिक ठिकाणी कशाप्रकारचे कपडे घालायचे हे त्यांना कळत नाही’ असे म्हणत अमायराला ट्रोल केले होते. ट्रोल करणाऱ्या व्यक्तिला अमायरानं चांगलच सडेतोड उत्तर दिलं.
‘तुमच्यासारखी मानसिकता असल्यामुळे स्त्रियांवर बलात्कार होतात. महिलांनी कसे कपडे घालावेत हे तुम्ही शिकवू नका. मुलांना महिलांचा आदर करायला आणि पुरुषांना बलात्कार करु नये असे शिकवा’ असे म्हणत अमायराने त्यांना चांगलेच सुनावले आहे.
अमायरानं बॉलिवूड सोबतच तमिळ, तेलुगु आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलं आहे. चित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते.
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या –
‘द कपिल शर्मा शो’मधील अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, सोशल…
‘कोरोना से डर नही लगता साहब, पंखे से लगता है’,…
सुशांतच्या बहिणीने शेअर केली ‘ती’ शेवटची पोस्ट,…
‘ब्रिटीश हवे होते अजून काही वर्ष…..’…
आणखी एका बाॅलिवूड अभिनेत्रीला कोरोनाची लागण, म्हणाली….