अभिनेत्री परिणीती चोप्रा तिच्या ‘या’ फोटोमुळे होतीय सोशल मीडियावर ट्रोल, पाहा व्हायरल फोटो

मुंबई | सध्या सायना नावाने चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आपल्या वेगवेगळ्या अंदाजाने चाहत्यांच्या मनावर राज करत असते. परिणीती सोशल मिडीयावर खूप अॅक्टीव्ह असल्याचं पाहायला मिळत असतं. ती तिच्या सोशल मीडीया आकाऊंटवरून काही-काही पोस्ट करत असते.

अशातच परिणीतीचा एक फोटो सोशल मीडीयावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे तिला ट्रोल केलं जात आहे. परिणीचा हा फोटो प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानी यानी आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे.

शेअर केलेल्या फोटोमध्ये परिणीती टॉपलेस असल्याच पाहायला मिळत आहे. फोटोमध्ये परिणीती एका बांधकामासाठी लागणारा माल वाहून नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मालगाडीत बसली आहे. त्यात तिचे खांदे आणि पायच दिसत आहेत.

परिणीती चोप्राचा बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या या लूकचे काहीजण कौतुक करत आहेत. तर काहीजण तिला ‘गाडी वाला आया, घरसे कचरा निकाल…’,असं म्हणत तिला सोशल मीडियावर ट्रोल देखील करत आहे.

डब्बू रत्नानीने यावर्षीचे कॅलेंडरशूट केलं आहे. त्यावेळी त्यानी परिणीतीचे शूट केलं असल्याचं समजत आहे. परिणीतीचा हा फोटो सोशल मीडीयावर पोस्ट करताना ‘हीच युवर वॅगन टू अ स्टार’, असं कॅप्शन डब्बूने दिलं आहे. यावर्षीच्या कॅलेंडरमध्ये अजून कोण-कोणत्या अभिनेत्रींना डब्बूने स्थान दिले आहे. याची सर्वांना जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे.

तसेच 2020 यावर्षीच्या कॅलेंडमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी ‘टॉपलेस’ लूकमध्ये दिसली होती. तेव्हा तिलाही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे 2019 च्या कॅलेंडरमध्ये सनी लिओनी ‘लॉपलेस’ झाली होती. यासोबतच यापूर्वी श्रद्धा कपूर, भूमी पेडणेकर या बॉलिवूड अभिनेत्रींनीही कॅलेंडरसाठी ‘टॉपलेस’ शूट केलं आहे.

दरम्यान, परिणीती चोप्राचा सध्या ‘सायना’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई नसली केली, तरी चित्रपटामधील परिणीतीच्या अभिनयाचे सर्वांकडून कौतुक केलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

थलैवा रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

सोन्याच्या दरात आज पुन्हा मोठी घसरण, आतापर्यंत तब्बल 12 हजार…

“देशातील कोरोनाची परिस्थीती अगदी ब्रिटनसारखी झाली…

‘या’ व्यक्तीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी…

पुणेकरांना दिलासा देणारी बातमी! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर…