थलैवा रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली | दरवर्षी चित्रपट सृष्टीमधील एका नांमवंत आणि त्याचबरोबर किर्तीवंत कलाकाराला दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविले जाते. याही वर्षी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. याआधी 50 कलाकरांना या पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे.

यावर्षीचा 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी सगळ्याचा लाडका थैलावा म्हणून फेमस असलेला दक्षिणात्य सुपस्टार रजिनीकांत यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे.

3 मे रोजी रजनीकांत यांना दादासाहेब पुरस्कार देण्यात येणार आहे. ही सर्व माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

त्यात त्यांनी मला या गोष्टीचा खूप आनंद होत आहे की, 2019 या वर्षाचा दादासाहेब फाळके पुरस्कार रजिकांत यांना मिळाला आहे. आशा भोसले, सुभाष घई, मोहनलाल, शंकर माहादेवन, विश्वजीत चटर्जी या पाच सदस्यांच्या एकमताने रजिनीकांत यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे, असं प्रकाश जावडेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

रजीनीकांत यांचा 12 डिसेंबर 1950 मध्ये बंगळुरूमधील एक मराठी घरात जन्म झाला. रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असे नाव आहे. रजनीकांत यांचा एका गरीब घराण्यात जन्म झाला असल्यामुळे त्यांना अतिशय मेहनत करावी लागली. त्यांच्या अपार कष्ट आणि परिश्रमामुळे टॉलिवूडमध्येच नाहीतर ते बॉलिवूडमध्येही त्यांचे खूप मोठे नाव आहे.

रजनीकांत यांनी वयाच्या 25 व्या वर्षी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केलं. रजनीकांत यांचा पहिला चित्रपट ‘अपूर्वा रागनगाल’ हा होता. या चित्रपटात त्यांच्या सोबत कमल हसन आणि श्रीविद्या हे देखील पाहायला मिळाले होते. रजनीकांत यांनी कमल हसन यांच्यासोबत बऱ्याच चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमीका साकारली आहे.

‘भैरवी’ हा रजनीकांत यांचा चित्रपट खूप हिट झाला होता. यामध्ये ते मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटापासून रजनीकांत यांचा सुपस्टारचा प्रवास सुरू झाला.  रजनीकांत यांना दक्षिणेकडील राज्यात थलैवा आणि देव मानले जाते.

टॉलिवूडमध्ये आपली छाप पाडल्यानंतर रजनीकांत यांनी बॉलिवूडमध्ये ‘अंधा कानून’ या चित्रपटामधून एन्ट्री केली. या चित्रपटामधील त्यांच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. त्यांची सिगारेट लिप करण्याची स्टाईल, कॉईन उडविण्याचा हटके अंदाज,  गोगल घालण्याची त्याचबरोबर त्यांची हसण्याची स्टाईल, अशा अनेक स्टाईल चाहत्यांच्या मनात घर करून गेल्या आहेत. त्यांच्या या स्टाईल्स देशातच नव्हे तर परदेशातही कॉपी केल्या गेल्या आहेत.


महत्वाच्या बातम्या-

सोन्याच्या दरात आज पुन्हा मोठी घसरण, आतापर्यंत तब्बल 12 हजार…

“देशातील कोरोनाची परिस्थीती अगदी ब्रिटनसारखी झाली…

‘या’ व्यक्तीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी…

पुणेकरांना दिलासा देणारी बातमी! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर…

नाशिक शहरात परिस्थिती गंभीर! कोरोना रुग्णांना बेड न…