अभिनेत्री प्राची देसाईनं लग्नाबद्दल केला खुलासा, म्हणाली….

मुंबई| अभिनेत्री प्राची देसाईने अवघ्या 17व्या वर्षी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून आपल्या करिअरची सुरूवात केली. प्राचीनं आपल्या कारकिर्दित अनेक चढ-उतारांचा सामना केला आहे. अनेक अडचणींना सामोरं जात ती आज या यशाच्या शिखरावर असलेली पहायला मिळत आहे. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून करिअरची सुरूवात करत बॉलिवूडपर्यंत आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे.

17 वर्षांची असताना प्राचीने मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तिने ‘रॉक ऑन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने काही चित्रपटांमध्ये काम केले. पण तिचे काही चित्रपट हिट ठरले तर काही फ्लॉप.

नुकत्याच दिलेल्या एक मुलाखतीत प्राचीनं तिच्या खासगी आयुष्यावर आणि करिअर प्लॅनवर भाष्य केलं. ज्यात तिनं तिच्या लग्नाबाबतही अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. तसेच करिअर चांगलं सुरू असताना मी अजिबात लग्न करणार नाही असंही प्राचीनं यावेळी स्पष्ट सांगितलं.

मुलाखतीमध्ये प्राचीला लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने, ‘माझ्या कुटुंबीयांनी मला ज्या प्रकारे लहानाचे मोठे केले ते पाहून लग्न करणे मला सुरक्षित वाटत नाही. जेव्हा माझ्या आयुष्यात खूप वाईट काळ सुरु असेल किंवा माझ्या खासगी आयुष्यात अनेक अडचणी असतील तेव्हा मी लग्न करु शकते. मी एकदम साध्या कुटुंबातून आले आहे आणि इथपर्यंत पोहोचणे माझ्यासाठी खूप कठिण होते’ असे उत्तर दिले.

प्राची पुढे म्हणाली की, माझे मित्र जेव्हा लग्नाबद्दल बोलत असतात की त्यांच्या घरी लग्नाबद्दल बोलायला सुरूवात झाली आहे तर मी पाहून हैराण होते. माझ्या कुटुंबातील लोक कधीच याबद्दल बोलत नाही. तसे तर ऑनस्क्रीन मी किती तरी वेळा लग्न केले आहे. माझा जो जोडीदार असेल त्याला खूप तयार रहावे लागेल. मी माझ्या सिद्धांतावर जीवन जगते आणि लग्नासाठी मी माझे स्वातंत्र्य गमावू शकत नाही.

प्राची देसाई म्हणाली की, मी काही वर्षांनंतर लग्न करू शकते पण परफेक्ट मुलगा माझ्या जीवनात येईल तेव्हा. माझ्या घरातल्यांनी कधीच लग्नाला घेऊन माझ्यावर जबरदस्ती केली नाही. ते माझा सन्मान करतात. मी बॉलिवूडमध्ये स्वतःच्या कौशल्यावर स्थान मिळवले आहे. माझा कोणीच गॉडफादर नाही.

काही दिवसांपूर्वीच ती मनोज बाजपेयीसोबत वेब सीरिज ‘सायलेन्स’मध्ये दिसली होती. जेव्हा तिला या मुलाखतीत तिच्या भविष्यातील प्लानबद्दल विचारण्यात आलं त्यावेळी ती म्हणाली, ‘एका दिग्दर्शकाचं काम खूप जबाबदारीचं असतं. पण तो जे करतो ते खूपच उत्तम असतं. हे काम अर्थातच खूप कठीण आहे. पण मला वाटतं मी ते करायला हवं. मी भविष्यात दिग्दर्शन करेन.’

दरम्यान, आपल्या सौंदर्य आणि अभिनयानं सगळ्यांना वेड लावणाऱ्या प्राची देसाईचे अनेक चाहते आहेत. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संपर्क साधत असते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prachi Desai (@prachidesai)

महत्वाच्या बातम्या –  

‘मिशन मजनू’च्या सेटवर दुर्घटना! सीन करताना…

अभिनेत्री करिना कपूरच्या ‘या’ मास्कची सर्वत्र…

तरूणाने हाताऐवजी तोंडात धरला चिप्स अन्, पुढे जे घडलं ते…

तरूणाने केला हवेत खतरनाक स्टंट, व्हिडीओ पाहून तुमच्याही…

केस कापताना तो ओक्साबोक्सी रडू लागला, व्हिडीओ पाहून तुम्ही…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy