मुंबई | कोरोना काळात अनेकांनी आपल्या कलागुणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याचे आपण पाहिलं आहे. त्यामध्ये काही मनोरंजनात्मक होते, तर काही विनोदी होते.
यामध्ये सर्वसामान्य लोकांपासून ते बॉलिवूड सुपस्टार अभिनेता-अभिनेत्री यांनीही आपले व्हिडीओ टाकले होते. सध्या इंस्टाग्रामवर रिल्स करायचा ट्रेन्ड निघाला आहे. अनेकजण कोणत्याही गाण्यावर व्हिडीओ शूट करून आपल्या इंस्टग्राम अकाऊंटवरून पोस्ट करत आहेत.
बॉलिवूडची अभिनेत्री श्रद्धा कपूर सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. अशातच श्रद्धा कपूरने आपल्या इंस्टग्राम अकाऊंवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे
व्हायरल व्हिडीओमध्ये श्रद्धा कपूर चक्क एका गोरिलासोबत डान्स करताना दिसत आहे. तिने अतिशय आनंदी असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. तसेच ती हिंदी गाण्यावर डान्स करत असल्याचंही व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे.
पोस्ट केलेल्या व्हिडीओमधील गोरिला खूप भायनक दिसत आहे. त्याच रूप पाहून कोणीही घाबरेल, असा तो दिसत आहे. मात्र श्रद्धा कपूर त्याला न घाबरता त्या गोरिलासोबत अतिशय प्रेमाने वागत आहे. तसेच त्याच्यासोबत छान ठुमके लगावत आहे.
लवकरच अॅमेझॉन प्रमाईम व्हिडीओवर ‘हेलो चार्ली’ हा साहसी कथेवर आधारित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. श्रद्धा कपूर आणि गोलिराचा हा व्हिडीओ देखील या चित्रपटाच्या प्रमोशनचा एक भाग असल्याचं दिसतं आहे. कारण या चित्रपटामध्ये टोटो गोलिरा आणि सरळ साधा चार्ली यांची गंमत पाहायला मिळणार आहे.
श्रद्धा कपूर सध्या ‘चालबाज इन लंडन’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त झाली आहे. या चित्रपटामध्ये ती दुहेरी भूमीका साकरणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच श्रद्धा ही पहिल्यांदाच दुहेरी भूमिका साकारणार असल्याने तिचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
तसेच श्रद्धा निखील व्दिवेदी यांच्या ‘नागीन’ चित्रपटात नागीन च्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. त्याचप्रमाणे श्रद्धा आपल्या वैयक्तिक आयुष्यातही खुप व्यस्त आहे. ती सध्या रोहन श्रेष्ठला डेट करत आहे. अद्याप या दोघांने आपल्या नात्याबद्दल उघडपणे जाहीर केलेले नाही.
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या-
अभिनेत्री प्राची देसाईनं लग्नाबद्दल केला खुलासा,…
आता माझी सटकली! संतापलेला कुत्रा मालकासमोर गेला अन्…;…
मिशन मजनू’च्या सेटवर दुर्घटना! सीन करताना…
अभिनेत्री करिना कपूरच्या ‘या’ मास्कची सर्वत्र…
तरूणाने हाताऐवजी तोंडात धरला चिप्स अन्, पुढे जे घडलं ते…