अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दिसणार नव्या भूमिकेत, ‘या’ शोचे करणार सूत्रसंचालन

मुंबई| अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक हिंदी व मराठी चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली आहे. तिने आतापर्यंत अनेक दर्जेदार मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिकणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आता एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

सोनाली एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही नवी भूमिका कोणत्या चित्रपटासाठी नसून तर एका रियॅलिटी शो साठी आहे. कारण सोनाली या कार्यक्रमात सूत्रसंचालकाचे काम करताना दिसणार आहे.

सोनी टिव्हीवरील ‘क्राइम पेट्रोल सतर्क: जस्टिस रिलोडेड’ या कार्यक्रमात सोनाली सूत्रसंचालकाची धुरा संभाळताना दिसणार आहे. सोनी वाहिनीने नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सोनाली कुलकर्णी या भागात सतर्कतेचे इशारे आणि विचार प्रक्रियेत आवश्यक असलेल्या फेरबदलांबद्दल सांगणार आहे. हे कठीण असून विचार करण्यास प्रवृत्त करते. एखाद्या गुन्ह्याविरोधात तक्रार दाखल करणे किती महत्त्वाचे असते, याबाबतही ती जागृती करताना दिसेल.

या नव्या भूमिकेबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणाली, “मी नुकतेच ‘क्राइम पेट्रोल’ च्या टीमसोबत काम सुरु केले आहे. टीम खूप अप्रतिम आहे. माझ्यासाठी क्राइम पेट्रोल हा एक बॅटरीसारखा आहे. तो सर्वांना जागृत करण्याचा प्रयत्न करतो. लोकांनी अशा प्रकारच्या सापळ्यात अडकण्याऐवजी काय करावे, याबद्दल जबाबदार असले पाहिजे, यासाठी लोकांना सतर्क करण्याचे काम मी करणार आहे.

‘क्राईम पेट्रोल’ या कार्यक्रमातून विविध गुन्हे त्यांची कथा ही नाट्यरुपांतर करुन दाखवली जाते. देशात रोज वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडताना दिसतात. यामध्ये अनेक बाजू दिसून येतात. जसे की गुन्हा कसा घडला, त्याचे गुन्हेगार कोण त्यांची पार्श्वभूमी, पीडित व्यक्तींची बाजू, यामध्ये पोलिसांची असणारी भूमिका, कामगिरी अशा अनेक बाबींवर प्रकाश टाकला जातो.

खर तर सोनाली पहिल्यांदाच अशा रियॅलिटी शोचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. यापूर्वी सोनालीला कधी आपण अशा स्वरुपात काम करताना पाहिलेले नाही. सोनालीचा एक वेगळाच अंदाज प्रोमोमध्ये दिसत आहे.

क्राइम पेट्रोल सतर्क: जस्टिस रिलोडेड हा कार्यक्रम 5 एप्रिलपासून रात्री 11 वाजता सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

स्वप्नांना लागली कोरोनाची नजर! पुण्यात…

प्रेक्षकांना पोटभोर हसवणाऱ्या कपिल शर्मानं केलं आपल्या…

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर अभिनेत्री कंगना राणौतचा…

‘त्याचा हात माझ्या पँटमध्ये होता’,…

चक्क तरूणाने केलं आपल्या मावशीसोबत लग्न, वाचा काय आहे प्रकरण