मुंबई | अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योजक राज कुंद्राला अश्लील व्हिडीओ प्रकरणी अटक झाल्यापासून अनेक गोष्टींचा उलगडा झालेला पाहायला मिळाला. अनेकांनी पुढे येत राज कुंद्रावर आरोप केले आहे. याप्रकरणात प्रसिद्ध अभिनेत्री गहना वशिष्ठही चांगलीच चर्चेत आलेली पाहायला मिळाली. अशातच आता पुन्हा एकदा गहना चर्चेचा विषय ठरत आहे.
अभिनेत्री गहना वशिष्ठनं आता पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. गहना काही दिवसांपूर्वी तुरुंगातून परतली आहे आणि जेव्हापासून ती तुरुंगातून आली तेव्हापासून पोलिसांवर निशाणा साधत आहे. गहनानं इन्स्टाग्रामवर स्वतःचे फाटलेले कपड्याचे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोसह गहनानं लिहिलं की, पोलिसांनी माझी ही अवस्था केली आहे. सर्व बँक अकाउंट फ्रीज केले आहेत, पैसे नाहीत, घरी जाता येत नाही कारण घरी गेले तर पोलीस पुन्हा अटक करतील. सर्व मोबाइल, लॅपटॉप घेतलं आहे. गेल्यावेळी जामीनासाठी गाडी गहाण ठेवली होती.
पुढे गहनानं म्हटलं की, मी सध्या अनोळखी लोकांसोबत राहत आहे. माझ्या घरावरही कब्जा केला आहे. काही हरकत नाही… आज माझी वेळ वाईट आहे, उद्या तुमची वेळ वाईट असेल. मी हार मानणार नाही.
अभिनेत्री गहनावर 87 अश्लील व्हिडीओ तयार केल्याचा आरोप असून ती ज्या वेबसाईटवर अश्लील व्हिडीओ अपलोड करायची. हे व्हिडीओ पाहण्यासाठी सबस्क्रायबरना दोन हजार रूपये भरावे लागत होते.
फेब्रुवारीमध्ये अश्लील व्हिडीओ शूट करत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणी अकरा जणांना अटक केली होती. अश्लील व्हिडीओ बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर या प्रकरणात अभिनेत्री गहना वशिष्ठचं नाव समोर आलं होतं.
अभिनेत्री गहना वशिष्ठ आणि उमेश कामत यांच्या चौकशीतून धागेदोरे लागत राज कुंद्राची चौकशी करण्यात आली. जवळपास 7 ते 8 तास चौकशी केल्यानंतर काल संध्याकाळी कुंद्रा यांना अटक करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या –
मी इंटिमेट सीन्स सर्वांसमोर शूट केले, पण मला…; जॅकी श्रॉफ यांचा शुटींगबद्दल खुलासा
“अभिनेत्रींना कीस करुन मला कंटाळा आलाय, ‘सिरीअल किसर’ ही ओळख मला नकोय”
…म्हणून मी लग्नाअगोदर गरोदर असल्याचं लपवलं होतं; नेहा धुपियाने केला खुलासा
‘बिग बाॅस ओटीटी’: बोलता बोलता शमिता राकेशला म्हणाली “इथे ये आणि आधी मला एक किस कर”, पाहा व्हिडीओ!
ड्रग्स प्रकरणात आता ‘या’ अभिनेत्याच्या घरावर छापा!