ऐश्वर्याचा नव्हे तर ‘या’ अभिनेत्रीचा पती बनणार होता अभिषेक, परंतु…

मुंबई | बॉलिवूड मधील अनेक कलाकार हे त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे जास्त चर्चेत असतात. आपल्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे चर्चेत राहणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता अभिषेक बच्चन.

अभिनेता अभिषेक बच्चन नेहमीच व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे जास्त चर्चेत राहतो. अभिषेक आज पत्नी ऐश्वर्या बरोबर सुखाचा संसार करत आहे. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की, अभिषेक हा ऐश्वर्याचा नव्हे तर बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलचा पती बनणार होता.

हेमा मालिनी यांना अभिषेक एक जावई म्हणून खूप आवडत होता. आपल्या मुलीसाठी त्या अभिषेकला एक योग्य मुलगा समजत होत्या. हेमा मालिनी यांना अभिषेकलाच आपला जावई बनवायचे होते. परंतु ईशाने या नात्याला स्पष्ट नकार दिला होता.

आपल्या मुलीने अभिषेकशी लग्न करावे, अशी हेमा मालिनी यांची ईच्छा होती. ही गोष्ट आहे 2005 सालची. त्यावेळी अभिषेक आणि ईशा दोघेही अविवाहीत होते. हेमा मालिनी आपल्या मुलीसाठी एक चांगला मुलगा शोधत होत्या. याचवेळी समाज माध्यमांवर हेमा मालिनी यांना जावई म्हणून अभिषेक आवडत असल्याच्या बातम्या फिरत होत्या.

याच काळात ईशा अभिनेता शाहिद कपूरसोबत करण जोहरच्या एका शोमध्ये आली होती. यावेळी करणने ईशाला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला. तो म्हणाला की, हेमाजींना अभिषेकसारखा जावई हवाय त्यावर तुझे काय मत आहे.

यावर उत्तर देताना ईशा म्हणाली की, माझी आई खूप गोड आहे. अभिषेक सध्या एक सर्वात पात्र बॅचलर आहे. यामुळे आई अभिषेकचं नाव घेत असते. तिची अशी इच्छा आहे की मी माझे घर एका चांगल्या जिवनसाथीदारासोबत घालवावे.

आईला अभिषेक एक जावई म्हणून खूप जास्त आवडतो. परंतु मला अभिषेकशी लग्न करायचे नाही. मी अभिषेकला माझ्या मोठ्या भावाप्रमाणे मानते, असं देखील ईशाने यावेळी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या –

मी इंटिमेट सीन्स सर्वांसमोर शूट केले, पण मला…; जॅकी श्रॉफ यांचा शुटींगबद्दल खुलासा

“अभिनेत्रींना कीस करुन मला कंटाळा आलाय, ‘सिरीअल किसर’ ही ओळख मला नकोय”

…म्हणून मी लग्नाअगोदर गरोदर असल्याचं लपवलं होतं; नेहा धुपियाने केला खुलासा

‘बिग बाॅस ओटीटी’: बोलता बोलता शमिता राकेशला म्हणाली “इथे ये आणि आधी मला एक किस कर”, पाहा व्हिडीओ!

ड्रग्स प्रकरणात आता ‘या’ अभिनेत्याच्या घरावर छापा!