रायगडला ‘निसर्ग’चा मोठा फटका; पालकमंत्री आदिती तटकरेंची मुख्यमंत्र्यांकडे ही महत्त्वाची मागणी

रायगड | निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका रायगड जिल्ह्याला बसला आहे. लोकांचं लाखो रूपयांचं नुकसान यामध्ये झालं आहे. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. तसंच झालेले नुकसान भरपाई म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विशेष आर्थिक पॅकेजची मागणी करणार असल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे.

या वादळाचा पंचनामा झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून याची सविस्तर माहिती देईन. तसंच त्यांच्याबरोबर याविषयी सविस्तर चर्चा करून लोकांची नुकसान भरपाई कश्या पद्धतीने देता येईल, हे पाहणार असल्याचं अदिती तटकरे यांनी सांगितलं.

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा रायगड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यामुळे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी नुकसानीचा आढावा घेतला आहे. त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांकडून नुकसानीची माहिती घेतली.

दरम्यान, रायगड जिल्ह्यात वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तसेच अनेक फळबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. अनेक घरांचेही नुकसान झाले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-रुग्णांना खाटा उपलब्ध होण्याच्या तक्रारी, खासगी रुग्णालयांना आरोग्यमंत्र्यांच्या अचानक भेटी

-सर्वात कमी लोकप्रियता असणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी तीन मुख्यमंत्री हे भाजपाशासित राज्यांमधले!

-हिंदुस्थान युनिलिव्हरकडून सरकारला मोठी मदत; उद्धव म्हणाले, तुमची मदत कधीच विसरणार नाही!

-निसर्ग चक्रीवादळाचं संकट टळलं, महाराष्ट्रावर विठू-माऊली आणि मुंबादेवीची कृपा- मुख्यमंत्री

-राज्यात आज 2560 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; पाहा तुमच्या भागात किती?