राग कोणाचा येतो, राज ठाकरे की नारायण राणे?; आदित्य ठाकरेने दिले हे उत्तर…

अहमदनगर |  संगमनेरमधील अमृतवाहिनी महाविद्यालयात युवा सांस्कृतिक महोत्सवात  ‘संवाद तरुणाईशी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात महाविकास आघाडीतील 2 मंत्र्यांसह 6 तरुण आमदारांशी प्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गुप्तेंनी  संवाद साधत काही रॅपिड फायर प्रश्न विचारले.

अवधूत गुप्तेंनी यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना पेचात पाडणारा प्रश्न विचारला, प्रश्न असा होता की कोणाचा राग जास्त येतो, राज ठाकरे की नारायण राणे? या प्रश्नावर मात्र आदित्य यांनी उत्तर देणं टाळलं. यासोबतच गुप्तेंनी आणखी पाच प्रश्न आदित्य यांना विचारले.

2) कोण जास्त आवडतं? अजित पवार की देवेंद्र फडणवीस?

उत्तर: अजित पवार

3) जवळचं कोण आई की बाबा?

उत्तर: आईबाबा

4) भाजपमधील  जवळचा नेता कोणता पंकजा मुंडे की एकनाथ खडसे?

उत्तर: महाविकास आघाडीसाठी दोन्हीही जवळचे नेते

5) सर्वाधिक धक्का कधी बसला, अजित पवार यांनी पहाटे शपथ घेतल्यावर की संजय राऊत लीलावतीवर गेल्यावर?

उत्तर: दोन्हीही वेळेस नाही

6) सर्वाधिक ऐकलेलं वाक्य कोणतं आमची चर्चा सुरु आहे, चर्चा सकारात्मक होत आहे, हे की मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आणि शपथविधी शिवतीर्थावर?

उत्तर: दोन्हीही

दरम्यान, कार्यक्रमाला राज्यमंत्री आदित्य तटकरे, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दीकी आदी नेते यावेळी उपस्थित होते. या नेत्यांनाही अवधूत गुप्ते यांनी प्रश्न विचारत त्यांना बोलतं केलं.

महत्वाच्या बातम्या-

लग्नाची ‘दिशा’ काय म्हणतीय? अवधूतच्या प्रश्नावर आदित्य क्लीनबोल्ड!

भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि अजित पवार यांंची पुण्यात भेट; चर्चांना उधाण

रोहित पवारांनी लावला थेट मोदींना फोन; म्हणाले, ‘मेरा नाम तो आपने सुना ही होगा…!’

बाळासाहेब ठाकरे हाजी मस्तानचे चांगले मित्र होते; डाॅनच्या पुत्राचा दावा

गांधी-आंबेडकर-सावरकरांचा इतिहास सांगणं गुन्हा आहे काय?; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र