…म्हणून आमदार महेश लांडगेंच्या डोळ्यात पाणी आलं- चंद्रकांत पाटील

पुणे | मला असं वाटतं की महेश लांडगे यांच्या डोळ्यातून पाणी आलं… आणि त्यांना बर वाटलं की या पक्षात आपल्याला तिकीट मागावं लागलं नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहेत.

विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये झालेल्या मेगाभरतीमुळे भाजपची संस्कृती बिघडली आहे, अशी स्पष्ट कबुली चंद्रकांत पाटील यांनी दिली. आज पिंपरी- चिंचवडमध्ये आयोजित पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते.

भाजपमध्ये मेगाभरती नाही तर मेगाचूक झाली आहे. पक्षाच्या हृदयाच्या जवळच्या माणसांना संधी दिली नाही. पण बाहेरुन आलेल्या लोकांना संधी मिळाली. भाजपमध्ये झालेली मेगाभरती ही चूक होती याची कबूली भाजपच्या कोणत्याचं नेत्याने दिली नव्हती, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, भाजपच्या मेगाभरतीमुळे भाजपची संस्कृती बिघडली असं खुद्द प्रदेशाध्यक्षांनीच सांगितल्याने आता भाजपमध्ये आलेल्या लोकांचं काय?, असा सवाल उपस्थित केला जातोय.

महत्त्वाच्या बातम्या-

लग्नाची ‘दिशा’ काय म्हणतीय? अवधूतच्या प्रश्नावर आदित्य क्लीनबोल्ड!

भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि अजित पवार यांंची पुण्यात भेट; चर्चांना उधाण

रोहित पवारांनी लावला थेट मोदींना फोन; म्हणाले, ‘मेरा नाम तो आपने सुना ही होगा…!’

बाळासाहेब ठाकरे हाजी मस्तानचे चांगले मित्र होते; डाॅनच्या पुत्राचा दावा