प्रकल्प आणताना स्थानिकांना विचारात घ्या; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर आदित्य यांचं उत्तर

ठाणे |  गेल्या दीड वर्षांपूर्वी जो मुद्दा अतिशय चर्चेत होता….. सत्ताधारी भाजपवर सत्तेत असलेलीच शिवसेना ज्या मुद्द्यावरून जोरदार आसूढ ओढत होती. तो मुद्दा म्हणजे कोकणातला प्रस्तावित नाणार प्रकल्प.  आता महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. हाच मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेच येणार आहे त्याचं कारण ठरलंय मुख्यमंत्र्यांचं नाणारसंबंधी एक वक्तव्य. प्रकल्पासाठी लोकांचा उत्साह पाहून पुन्हा एकदा चर्चा करावी असं वाटतंय, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी काल कोकणात केलं. यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांच्याच वक्तव्यावर शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.

आमचा कोणत्याही प्रकल्पाला विरोध नाही. पण, प्रकल्पांमुळे पर्यावरणाची हानी होऊ नये आणि असे प्रकल्प आणताना स्थानिकांना विश्वासात घ्यायला हवं, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे यांची जनआशिर्वाद यात्रा मंगळवारी रात्री ठाण्यात होती. या निमित्ताने ठाण्यातील एन.के.टी सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये बोलताना आदित्य यांनी राज्यात युती सरकारने केलेल्या कामाची माहिती दिली.

आज कोणताही निर्णय जाहीर करत नाही, मात्र पुन्हा एकदा तुम्हाला भेटणार, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणात बोलताना नाणार रिफायनरीवर मोठं वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, गेल्या दीड वर्षांपूर्वी शिवसेनेने नाणार प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता.

महत्वाच्या बातम्या-