सत्ता हाती घेतल्यापासून शिवसेनेनं 100 टक्के समाजकारण केलं- आदित्य ठाकरे

मुंबई | शिवसेना ही 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण अशी होती. पण जेव्हापासून आपण सत्ता हाती घेतली आहे त्यापासून आपण 100 टक्के समाजकारण केलं आहे, अस मत शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं.

आपण आपली वचनं पूर्ण करण्यास सुरुवात केलेली आहे, असंही ते म्हणाले. शिवसेनेच्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

पाच दशके आपण जशी लोकांची सेवा केली तशी पुढेही आपल्याला सेवा करायची आहे. गाव तिथे शाखा हे काम आपल्याला हाती घ्यायचे आहे, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.

प्रथम ती असा कार्यक्रम आपण हाती घेतला होता. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातल्या प्रत्येक राज्यात आपली शिवसेनेची शाखा असायला पाहिजे आणि त्या शाखेचा आवाज बुलंद करायचा हा प्रयत्न आपला असायला पाहिजे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-उद्धव ठाकरेंकडे आपण उद्याचे पंतप्रधान म्हणून पाहतोय- संजय राऊत

-‘भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही करणार’; सेनेच्या 54 व्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा निर्धार

-चार महिन्यांच्या बाळाला चांदणी चौकातील झुडपात सोडणारी आई अटकेत

-‘…तर भाजप ठाकरे सरकारला पाठिंबा देईल’; ‘या’ भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

-फिल्मी बॅकग्राऊंड असूनही फ्लॉप ठरले ‘हे’ स्टार किड्स; पाचवा कलाकार तर सर्वात अनलकी!