उद्धव ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वात शिवसेना भविष्यात अधिक यश मिळवेल- अजित पवार

मुंबई |  मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी स्थापन झालेल्या शिवसेना पक्षाचा आज 54 वा वर्धापन दिन आहे. विविध राजकीय पक्षाचे नेते शिवसेना पक्षप्रमुखांना तसंच पक्षाला शुभेच्छा देत आहे. यात शिवसेनेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शुभेच्छा खास लक्षात राहणाऱ्या आहेत.

शिवसेनेच्या वर्धापनदिनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खास फेसबुक पोस्ट लिहिली आहे. या फेसबुक पोस्टमधून त्यांनी शिवसेनेला वर्धापनदिनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वगुणांचं कौतुक केलं आहे.

महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तसंच शिवसेना नेते, मंत्रिमंडळ सहकारी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शुभेच्छा! शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना वंदन! महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत शिवसेनेचं महत्त्वाचं योगदान आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक प्रमुख पक्ष आज, महाविकास आघाडीत आमच्यासोबत आहे, याचा आनंद आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शिवसेनेसोबत काम करत असताना येणारे अनुभव सुखावणारे आहेत. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली शिवसेना भविष्यात अधिक यश मिळवेल, अशा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-सत्ता हाती घेतल्यापासून शिवसेनेनं 100 टक्के समाजकारण केलं- आदित्य ठाकरे

-उद्धव ठाकरेंकडे आपण उद्याचे पंतप्रधान म्हणून पाहतोय- संजय राऊत

-‘भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही करणार’; सेनेच्या 54 व्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा निर्धार

-चार महिन्यांच्या बाळाला चांदणी चौकातील झुडपात सोडणारी आई अटकेत

-‘…तर भाजप ठाकरे सरकारला पाठिंबा देईल’; ‘या’ भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य