कौतुकास्पद! ढोलकवर थाप मारत चिमुकल्यानं गायलं सुंदर रॅप, पाहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियामुळे एकाचवेळी लाखो लोकांपर्यंत पोहोचणं सहज शक्य झालं आहे. या समाज माध्यमांनी प्रसिद्धीपासून लांब असलेल्या अनेक कलाकारांना एका वेगळ्या उंचीवर नेहून ठेवलं आहे. सोशल मीडियावरील एका पोस्ट नशीब पलटण्यास पुरेशी असते.

अशातच सध्या सोशल मीडियावर एका मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण त्याच्या कलेला दाद देत आहेत. या मुलाला देखील एक चान्स नक्कीच दिला गेला पाहिजे, असं काही लोक बोलत आहेत.

रेल्वेमध्ये आपल्या कलांचं प्रदर्शन करणारे अनेक लोक तुम्ही पाहिले असतील. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये देखील एक मुलगा रेल्वेमध्ये रॅप म्हणताना दिसत आहे. हा मुलगा चक्क ढोलक वाजवत रॅप म्हणत आहे. यामुळे सर्वांनाच त्याचं नवल वाटत आहे.

बॉलिवूड मधील प्रसिद्ध रॅपर बादशाह यांनी गायलेलं ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ हे गाणं ढोलकच्या तालावर हा मुलगा गाताना दिसत आहे. एक रॅप साँग गातना या मुलाने जो ढोलकवर ठेका धरला आहे, तो सर्वांनाच आश्चर्यचकीत करत आहे.

हा मुलगा खूप आत्मविश्वासाने गाणं गात आहे. यामुळे त्याच्या आत्मविश्वासाचे देखील नेटकरी खूप कौतुक करत आहेत. या मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याला देखील प्रसिद्ध होण्याचा हक्क आहे , अशा प्रतिक्रिया लोक देत आहेत.

दरम्यान, भूतनी के मीम्स या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. याला देखील एक चान्स मिळाला पाहिजे, असा कॅप्शन या व्हिडीओवर देण्यात आला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप समोर आलं नाही.

https://www.instagram.com/p/CTgWvTpKtm5/?utm_source=ig_embed&ig_rid=bbf2076e-9536-4b77-a50e-6e095382bffd

महत्वाच्या बातम्या-

सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाजच्या वडिलांनी मुलीसाठी उचललं मोठं पाऊल!

“मामा-मामी माझ्या आईवडिलांसारखे आहेत, मी त्यांची माफी मागतो”

नवरदेवानं असं काही केलं ते पाहून नवरीला बसला धक्का, पाहा व्हिडीओ

पर्यटकांच्या गाडीवर थेट चढला चित्ता अन्…पाहा व्हिडीओ

धक्कादायक! दाढी करताना वस्तारा लागला तरूणाच्या गळ्याला अन्…, पाहा व्हिडीओ