कौतुकास्पद! भावाच्या लग्नासाठी ठेवलेल्या पैशांतून करतोय कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा

पुणे| देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या जशी वाढतेय, तशी मृतांची संख्याही मन हेलवणारी आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. तर दुसरीकडे आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत असल्याचे चित्र दिसत आहे. देशातील प्रत्येक राज्यात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देश हादरलाय. अशा परिस्थितीत विविध ठिकाणी, आॅक्सिडजन, बेड आणि औषधांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवतेय. ही कमतरता भरुन काढण्यासाठी राज्य तसंच केंद्र सरकारही त्यांच्या परीने प्रयत्न करतच आहे.

अशा संकट काळात लोहगाव येथील तरुणांनी पुढाकार घेत रुग्णांपर्यंत आॅक्सिजन पोहचवण्याचं काम सुरु केलं आहे.

लोहगाव येथील प्रशांत जगताप या तरुणाने या उपक्रमाला सुरुवात केली आहे. त्याच्याबरोबर अविनाश पोथवडे, सौरभ जगताप, दत्तात्रय जाधव, विश्वजित पोतेकर हे सर्वही या उपक्रमात सहभागी झाले आहेत.

मागच्या आठवड्यात प्रशांत जगताप यांचा भाऊ सौरभ जगतापचे लग्न होतं. त्याच्या लग्नासाठी 3 लाख 50 हजार खर्च करण्याचा विचार होता. पण सध्याची परिस्थिती पाहून हे पैसे समाजउपयोगी कामासाठी वापरावेत असं त्याने ठरवलं.

या पैशातून आॅक्सिजनचे 36 सिलेंडर विकत घेतले. नागरिकांना आॅक्सिजन पुरवठा करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत त्यांना 25 रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिली.

समाजासाठी आपणही काहीतरी देणं लागतो. या उद्देशाने हा उपक्रम चालू केला. आता आमच्याकडे 36 सिलेंडर आहेत. काही संस्थांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. सिलेंडर घेण्यासाठी त्यांनी आर्थिक साहाय्य करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे 36 हा आकडा लवकरच 100 किंवा त्यापेक्षा जास्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं प्रशांत जगतापने यावेळी सांगितलं.

दरम्यान, सध्या वेळ कठिण आहे, पण प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून प्रशासनालाही मदत केली पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकाला मदत करणे हीच काळाची गरज बनली आहे. कोरोना लढाईत आपण सगळे एकत्र आहोत असे म्हणत अनेक लोक कोरोना काळात मदत करताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

उतवळा नवरा गुडघ्याला बाशिंग! स्वत:च्याच लग्नात नवदेव वाजवू…

स्कुटीवाला अचानक मध्ये आला अन्…, व्हिडीओ पाहून…

कोरोनाबाधित 95 वर्षाच्या आजीने असं काही केलं की, व्हिडीओ…

‘इमेज बनवण्यापेक्षा लोकांचे जीव कसे वाचतील याकडे लक्ष…

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी जडेजा घेतोय मेहनत, पाहा व्हायरल…