फार मोठ्या घसरणीनंतर अखेर सोन्याचे भाव स्थिरावले; वाचा ताजे दर

नवी दिल्ली | अलिकडे काही वर्षांमध्ये सोन्याचे भा.व गगनाला भि.डले आहेत. एक उत्तम गुं.तवणूक म्हणून लोक सोन्याला प्राधान्य देत आहेत. 2020 मध्ये सोन्याच्या किंमतीत तब्बल 20 टक्क्यांची वा.ढ पहायला मिळाली आहे. यंदा देखील सोन्याच्या किंमतीत खूप जास्त वा.ढ होऊ शकते, असं अनेक अर्थतज्ञ बोलत आहेत.

मागील आठवड्यात सोन्याच्या किंमतीत सतत चढउतार पहायला मिळाला आहे. मात्र, आता फार मोठ्या घसरणीनंतर अखेर सोन्याचे भाव स्थिरावले आहेत. गेल्या दोन दिवसांत एमसीएक्सवर सोन्याच्या किंमतीत काहीही बदल झालेला नाही.

आज एमसीएक्सवर 24 कॅरेट सोन्याचा दर 46 हजार 130 रुपये प्रती तोळा इतका आहे.  एमसीएक्सवर  20 फेब्रुवारीपासून हाच दर स्थिर आहे. सोन्याप्रमाणे चांदीचे दर देखील  गेल्या दोन दिवसांपासून स्थिर आहेत.

आज एमसीएक्सवर चांदींचा दर 69 हजार रूपये प्रती किलो इतका आहे. एमसीएक्सवर  20 फेब्रुवारीला चांदीच्या दरात 300 रूपयांची वाढ होऊन चांदी 69 हजार रूपये प्रती किलो इतकी झाली होती. हाच दर आज देखील स्थिर आहे.

दरम्यान, मोदी सरकार सोन्याची बाबतीत लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. मोदी सरकार सध्या ‘वन नेशन वन गोल्ड’ ही व्यवस्था संपूर्ण देशभरात लागू करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

‘वन नेशन वन गोल्ड’ या योजने अंतर्गत संपूर्ण देशभरात सोन्याचे भाव एकच असतील. भारत देश इतर काही देशांकडून सोनं आयात करतो. देशात आयात केलं जाणाऱ्या सोन्याची किंमत जवळपास एकसारखीच असते. परंतु पुढे हीच किंमत भागानुसार बदलत जाते.

संपूर्ण देशभरात अनेक ज्वेलर्स असोसिएशन आहेत. प्रत्येक भागात बदलत जाणाऱ्या सोन्याच्या किंमती हेच असोसिएशन ठरवत असतात. यामुळे देशात विविध भागात गेल्यानंतर सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

अलिकडच्या काही वर्षांमध्ये देशात आपण जसजसे दक्षिणेकडे जावू तशा सोन्याच्या किंमतीत घट होताना दिसली आहे. मात्र, याच सोन्याच्या किंमती आपण देशात उत्तरेकडे जाताना वाढताना दिसतात. दक्षिणेतील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून कमी मार्जिन व.सूल करतात. तर देशातील उत्तरेकडील ज्वेलर्स असोसिएशन ग्राहकांकडून जास्त मार्जिन घेतात.

देशातील अनेक ज्वेलर्स असोसिएशन सध्या मोदी सरकारकडे ‘वन नेशन वन गोल्ड’ ही योजना संपूर्ण देशभरात लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी करत आहेत. मोदी सरकार ज्वेलर्स असोसिएशनच्या या मागणीवर विचार करत असले तरी अद्याप सरकारने याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

महत्वाच्या बातम्या-

आणखी एक टिकटॉक स्टार काळाच्या पडद्याआड! राहत्या घरी केली आत्मह.त्या

गुगलची ‘ही’ खास सेवा होणार बंद; त्वरित बॅकअप न घेतल्यास तुमचा डेटा होणार डिलीट!

नेहा कक्करला आहे ‘हा’ आजार, स्वतःच केला खुलासा म्हणाली….

ध.क्कादायक! लग्नातील आचाऱ्यानं चपात्यांसोबत केला ‘हा’ घाणेरडा प्रकार, पाहा व्हिडिओ

करिना आणि सैफच्या घरी नवीन पाहुण्याचं आगमन; सोशल मीडियावर चर्चांना उधान