आमिर खान पाठोपाठ ‘या’ अभिनेत्यानंही घेतला सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय, म्हणाला….

मुंबई| बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं नुकतात सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे. यातच आता आणखी एका अभिनेत्यानं सोशल मिडियाला अलविदा केलेलं पहायला मिळत आहे.

अभिनेता सुशांत सिंग यानं आमिर खानच्या पावलांवर पाउल ठेवत सोशल मीडियाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. सुशांतनं सोमवारी आपल्या सोशल मीडिया अकांऊंटवरुन ही माहिती शेअर केली.

अभिनेता सुशांत सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असलेला पहायला मिळायचा. प्रत्येक गोष्टीत आपलं मत मांडायचा. मात्र आता सुशांतच्या या निर्णयानं त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण दिसत आहे.

सुशांतनं सोशस मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटलं की, “सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवरुन ब्रेक घेत आहे. रिबूट करण्याची आवश्यकता आहे.” त्याचं ट्विटर अकाऊंटही बंद असल्याचं दिसत आहे. सुशांतचे चाहते कमेंट करुन यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे.

सावधान इंडियाचा माजी सूत्रसंचालकाचं काम सुशांत सिंगनं बराच काळ केलं.  मात्र 2019 मध्ये सुशांतला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. सुशांत सिंगने भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईचा त्याने निषेध केल्यानंतर त्याला मालिकेतून काढण्यात आले होते.

शोमध्ये घेतलेल्या निर्णयाचा चाहत्यांना खूप राग आला होता. त्यांनी सुशांतला शोमध्ये पुन्हा आणण्याचे आवाहन केले होते, मात्र तसे झाले नाही. या मालिकेतून काढल्यानंतर सावधान इंडिया एका पोलीस अधिकाऱ्याच्या दृष्टीकोनातून सादर केला होता.

दरम्यान, आमिरने सोशल मीडियाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. आमिरने त्याची शेवटची पोस्ट शेअर करत ही बातमी त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे.

“ही माझी सोशल मीडियावरची शेवटची पोस्ट असेल. असंही मी फारच अॅक्टिव्ह होतो सोशल मीडियावर पण तरीही मी इकडून रजा घेण्याचा निर्णय घेतला आहे.” त्याच्या ऑफिशिअल टीमचं हँडल शेअर करत आपण आता यावरून त्याच्याबद्दलचे अपडेट्स मिळतील असंही आमिरनं म्हणाला.

 

 

महत्वाच्या बातम्या – 

पुण्यात महापौर मुरलीधर मोहोळांनी लागू केले ‘हे’…

‘या’ भाजप खासदाराचा संशयास्पद मृ.त्यू,…

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राजेश टोपेंनी आरोग्यमंत्री…

माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचं कोरोनामुळे निधन

चाहत्याचं अनोखं गिफ्ट पाहून रितेश झाला भावूक; पाहा व्हिडीओ