“10 रुपये की पेप्सी, कोहली भाई सेक्सी” ऐकताच विराटने मैदानात केलं असं काही की…; पाहा व्हिडीओ

मुंबई | भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-ट्वेंटी सामने खेळण्यात आले होते. या मालिकेत भारताने श्रीलंकेचा 3-0 असा धुव्वा उडवला. त्यानंतर आता कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे.

मोहालीमध्ये पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला होता. त्यात भारताने आक्रमक अंदाजात सामना जिंकला. भारत-श्रीलंका कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी हा कसोटी सामना खूप खास होता. श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना हा विराट कोहलीच्या कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना होता.

कोहलीसाठी खास सामना असल्याने या सामन्यासाठी प्रेक्षकांना देखील संधी देण्यात आली होती. बोर्डाने 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला होता.

भारतीय कर्णधार रोहित शर्माने त्याला ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन सन्मानित केलं. विराटच्या चाहत्यांनी यावेळी स्टेडियममध्ये गर्दी केली होती.

सामन्याच्या पहिल्या डावात विराट कोहलीला केवळ 45 धावा करता आल्या. क्षेत्ररक्षणादरम्यान कोहलीने चाहत्यांचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

या सामन्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात विराटचे चाहते त्याला बघून ’10 रुपये की पेप्सी, कोहली भाई सेक्सी’, अशा आरोळ्या देत आहेत.

त्यावेळी विराटने देखील फॅन्सचं देखील मनोरंजन केलं. त्याने नोट उडवण्याचा इशारा देखील केला. तर शिट्टी देखील वाजवली. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ-


महत्वाच्या बातम्या- 

“अजित पवार तुमच्या शब्दाला काडीची किंमत नाही, मोठेपणा दाखवायचा बंद करा”

Women’s Day निमित्त महिला पोलिसांना मोठं गिफ्ट; आता ‘इतक्या’ तासांची असणार शिफ्ट 

शिवसेनेच्या 25 आमदारांच्या नाराजीबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

आदित्य ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तीच्या घरावर आयकर विभागाची धाड! 

निवडणुकीच्या निकालाआधीच काँग्रेस सावध; घेतला ‘हा’ मोठा निर्णय