Maruti Suzuki Dzire CNG भारतीय बाजारात दाखल, मायलेज तर विचारूच नका…; पाहा किंमत

नवी दिल्ली | कोरोना महामारीनं अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. भारतीय वाहन बाजार हा जगातील प्रमुख वाहन बाजार आहे. या बाजाराला देखील कोरोना काळाचा प्रचंड फटका बसला होता.

कोरोनाचा प्रादुर्भाव जसाजसा कमी होत आहे तसंतसं भारतीय वाहन बाजारात तेजी पहायला मिळत आहे. अशातच आता मारूती कंपनी आपल्या खास फिचरच्या नवीन माॅडेलला लाॅन्च करणार आहे.

मारूती कंपनीनं आपल्या बेस्ट सेलर सेडान कारच्या सीएनजी माॅडेलला बाजारात दाखल करत असल्याची घोषणा केल्यानं ग्राहकांना गाडीची आतुरता लागली आहे. मारूती सुझुकी डिझायर सीएनजी दोन व्हेरियंटमध्ये (Maruti Suzuki Dzire CNG ) असणार आहे.

मारूती सुझुकी डिझायर सीएनजी व्हीएक्सआयची एक्स शोरूम किंमत 8.14 लाख रूपये ठेवण्यात आली आहे. तर मारूती सुझुकी डिझायर सीएनजी झेडएक्सआयची किंमत 8.82 लाख रूपये ठेवण्यात आली आहे.

डिझायर सीएनजी माॅडेलचे मासिक सबस्क्रिप्शन 16 हजार 999 रूपयांपासून सुरू होते. परिणामी ग्राहकांना ही गाडी अनेक अर्थांनी परवडणारी आहे. सध्या गाडीच्या प्रमोशनवर कंपनी भर देत आहे.

मारूती सुझुकीची सीएनजी गाडी आपल्याच प्रकारातील टाटा आणि ह्युंदाईच्या सीएनजी गाड्यांना टक्कर देणार आहे. परिणामी बाजारामध्ये स्पर्धा पहायला मिळणार आहे. सध्या सीएनजी गाड्यांमध्ये टाटा आणि ह्युंदाई कंपनीची मक्तेदारी आहे.

मारूती सुझुकीच्या पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटप्रमाणंच सीएनजी व्हेरियंटमध्ये आकर्षक सुविधा असणार आहेत. सीएनजी गाडी सरासरी 31.12 प्रतिकिलोग्रामचे मायलेज देते. इतर गाड्यांच्या स्पर्धेत ही गाडी रंगत आणण्याची शक्यता आहे.

दरम्यान, देशात सध्या नवीन सीएनजी धोरण लागू झालं आहे. तेव्हापासून केंद्र आणि राज्य सरकारकडून सीएनजी गाड्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. इको फ्रेन्डली गाड्या उतरवण्यावर सर्वांचा भर आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Women’s Day निमित्त महिला पोलिसांना मोठं गिफ्ट; आता ‘इतक्या’ तासांची असणार शिफ्ट 

शिवसेनेच्या 25 आमदारांच्या नाराजीबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

आदित्य ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तीच्या घरावर आयकर विभागाची धाड! 

निवडणुकीच्या निकालाआधीच काँग्रेस सावध; घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

“…त्यांचं वाटोळं होईल आणि त्यांना दिव्यांग मुलं जन्माला येतील”