“हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठं स्टेडियम बनवून त्याला स्वत:चं नाव दिलं होतं”

मुंबई | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहे. विरोधी पक्षातील नेते आणि सत्ताधारी पक्षातील नेते यांच्यात सतत कोणत्या न कोणत्या मुद्यावरुन आरोप प्रत्यारोपाची खेळी चालूच आहे. अशातच आता अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असलेल्या मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव दिल्यानं देशातील वातावरण चांगलच तापलं आहे.

‘सरदार पटेल स्टेडियम’चे ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ असं नामकरण करण्यात आलं आहे. क्रिकेट स्टेडियमला मोदींचं नाव दिल्यानं विरोधक चांगलेच आ.क्रमक झाले आहेत. कालपासून विरोधी पक्षातील अनेक नेते या मुद्यावरुन मोदींवर टिका करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील यावरुन मोदींवर निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड यांना यासंबंधीत एक ट्वीट केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मोदींची तुलना हिटलर बरोबर केली आहे.

स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते व गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरात मधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतले. हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते, असं ट्वीट आव्हाड यांनी केलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी नरेंद्र मोदींचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टि.केला भाजप नेते काय प्रत्युत्तर देणार, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, नुकतंच बुधवारी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं. या स्टेडियमच्या उद्घाटन कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या क्रिकेट स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 1 लाख 32 हजार आहे. बुधवारी उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी या स्टेडियमच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, सरदार पटेल स्टेडियमच्या बदललेल्या नरेंद्र मोदी स्टेडियम या नविन नावामुळे चांगलाच वा.द पे.टला आहे.

महत्वाच्या बातम्या –

“मुख्यमंत्री संवेदनशील आहेत, ते राठोड सारख्या घाणेरड्या माणसाचा राजीनामा घेणाार”

भाजपच्या त्रासाला कंटाळून खासदार डेलकर यांची आत्मह.त्या?

जाणून घ्या! काजू खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमला आता नरेंद्र मोदींचं नाव! सोशल मीडियावर चर्चांना उधान

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बाथटबमधील फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा फोटो