“आरे, नाणार नंतर आता मराठा मोर्चातील आंदोलकांवरीलही गुन्हे मागे घ्या”

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे  या नेत्यांनी आरे आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्ह्यांबाबतही निर्णय घेण्याची मागणी केली. आता त्यांनी मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर निवडणुकीतील आपल्या आश्वासनांच्या पुर्ततेसाठी प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी  मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी याबाबत ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांच्याकडे ही मागणी केली.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान अनेक आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता आपलं सरकार आलं आहे. त्यामुळे हे गुन्हे मागे घेण्यात यावेत, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-