मुंबई | उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील सरकार आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत वेगवेगळ्या विचारधारांचे पक्ष एकत्र आलेत, हे सत्य असले तरी या आघाडीत पूर्णपणे एकवाक्यता आहे. समान किमान कार्यक्रम केंद्रस्थानी ठेवून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत, असं शरद पवारांनी सांगितलं आहे.
भाजपचा मार्ग आम्ही चोखाळू शकत नाही. तसेच भाजपच्या तुलनेत शिवसेनेसोबत काम करणं मला निश्चितच सोपं वाटतं, असंही शरद पवार यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सरकार स्थापनेबाबत ज्याप्रकारे चर्चा सुरू होती त्यावरून अजित पवार नाराज होते. या चर्चेच्या गुऱ्हाळाला कंटाळूनच त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.
महत्वाच्या बातम्या-
“आरे, नाणार नंतर आता मराठा मोर्चातील आंदोलकांवरीलही गुन्हे मागे घ्या”- https://t.co/8uMCdTiA8z @Awhadspeaks @NCPspeaks @ShivSena @OfficeofUT
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 4, 2019
“…तर हे सरकार पाच वर्षे टिकणार नाही” – https://t.co/c07AVTq6fb @ShivSena @BJP4Maharashtra @OfficeofUT
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019
….तो तर पंतप्रधानांच्या मनाचा मोठेपणा- सुप्रिया सुळे – https://t.co/upRREcimRk @supriya_sule @narendramodi @NCPspeaks #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019