सरकारची भन्नाट योजना, निवृत्तीनंतर दर महिन्याला मिळतील ‘इतके’ हजार रुपये

नवी दिल्ली | ज्यावेळी तुम्ही नोकरी करत असाल त्यावेळीच तुमचा कल हा गुंतवणूकीकडे लागला असणं महत्वाचं. त्यावेळी तुम्हाला निवृत्तीनंतर पेन्शन (Pension) मिळणार आहे.

नॅशनल पेन्शन स्कीममध्ये National Pension Scheme (NPS) गुंतवणूक करणे सोपे आहे. तसेच, एक सुरक्षित पर्याय आणि चांगला परतावा यातून दिला जातो.

अनेकजण नोकरदार वर्ग नॅशनल पेन्शन स्कीम अर्थात NPS मध्ये गुंतवणूक करु शकतात. ही योजना 2004 साली सुरू झाली होती.

या स्कीममध्ये सर्वात आधी केवळ सरकारी कर्मचारी गुंतवणूक करू शकत होते. पण, 2009 साली ही योजना सर्वांसाठी सुरु करण्यात आली. NPS मध्ये रिटायरमेंट आधी पैसे भरावे लागतात.

18 ते 65 वर्षांची कोणतीही व्यक्ती NPS मध्ये गुंतवणूक करू शकते. NPS मधील गुंतवणूक पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे Pension Fund Regulatory & Development Authority (PFRDA) नियुक्त केलेल्या पेन्शन फंड मॅनेजर कडून व्यवस्थापित केले जातात.

तुम्ही एकूण 7 पेन्शन फंड मॅनेजर्सपैकी कोणत्याही एकाची निवड करू शकणार आहात. पेन्शन फंड मध्ये 60 वर्षांपर्यंत गुंतवणूक केली जातेय. त्यानंतर 1 NPS Annuity Plan घ्यावा लागतो.

महत्त्वाच्या बातम्या- 

“देशातील वातावरण ठरवून बिघडवण्याचा प्रयत्न होतोय” 

दिल्लीमध्ये दगडफेकीनंतर हाय अलर्ट; अरविंद केजरीवालांनी उचललं मोठं पाऊल

लोडशेडिंगबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती! 

कोल्हापूरच्या निकालावरून शरद पवारांचा भाजपला सणसणीत टोला, म्हणाले…

IPL 2022: दिल्लीचा 16 धावांनी पराभव करत बंगळुरूचा ‘राॅयल’ विजय; DKची वादळी खेळी