Raj Thackeray | राज ठाकरेंनी केल्या ‘या’ दोन मोठ्या घोषणा

पुणे | मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. शनिवारी हनुमान जयंतीच्या निमित्ताने महाआरती झाल्यानंतर आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा भोंग्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली.

देशभरातल्या हिंदू बांधवांनी तयार रहावं. जर 3 तारखेला समजलं नाही तर या देशातल्या न्यायव्यवस्था कायदा या पेक्षा भोंगा मोठा वाटत असेल तर तसचं उत्तर द्यावं लागेल, असा इशारा राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा दिला.

5 जूनला सर्व सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार आहे, अशी घोषणा राज ठाकरेंनी केली आहे. आम्हाला कुठली ही दंगल नको, असं ते म्हणालेत.

1 मे रोजी महाराष्ट्र दिनी संभाजीनगर येथे जाहीर सभा घेणार आहे. आणि 5 जूनच्या दिवशी अयोध्येला जाणार आहे. 5 तारखेला सहकाऱ्यांना सोबत घेऊन अयोध्येला जाणार आहे, अशी घोषणा राज यांनी केली.

आमची सर्व तयारी सुरू आहे आम्हाला शांतता भंग करायची नाही आहे. प्रार्थनेला विरोध नाही पण जर त्यांना loud स्पीकर वर ऐकवायचं असेल तर आम्ही ही आरत्या भोंग्यावर लाऊ, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.

देशभरातल्या हिंदू बांधवांनी तयार रहा. जर 3 तारखेला समजलं नाही तर या देशातल्या न्यायव्यवस्था कायदा या पेक्षा भोंगा मोठा वाटत असेल तर तसचं उत्तर द्यावं लागेल, असंही त्यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

सरकारची भन्नाट योजना, निवृत्तीनंतर दर महिन्याला मिळतील ‘इतके’ हजार रुपये

“देशातील वातावरण ठरवून बिघडवण्याचा प्रयत्न होतोय” 

दिल्लीमध्ये दगडफेकीनंतर हाय अलर्ट; अरविंद केजरीवालांनी उचललं मोठं पाऊल

लोडशेडिंगबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती! 

कोल्हापूरच्या निकालावरून शरद पवारांचा भाजपला सणसणीत टोला, म्हणाले…