‘या’ पक्षाच्या आक्षेपानंतर मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज सील

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. काँग्रेसचे आशिष देशमुख हे मुख्यमंत्र्यांविरोधात उमेदवार आहेत. काँग्रेसच्या आक्षेपानंतर मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्याकडून सील करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रावर शिक्का मारणाऱ्या नोटरीची टर्म संपल्याचा दावा आशिष देशमुख यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याची मागणी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली आहे. यावर लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथपत्रासाठी जे मुद्रांक विकत घेतलं, ते 3 तारखेला घेण्यात आलं आहे. शपथपत्राची दस्तनोंदणी करणाऱ्या नोटरीचा शिक्काही या शपथपत्रावर आहे. 

या शिक्क्यामध्ये असलेल्या नोटरीचा कार्यकाळ 2018 पर्यंतच असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे.

दरम्यान, भाजपचे शिर्डी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांचा विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज धोक्यात येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी विखेंच्या अर्जावर आक्षेप घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या-