राष्ट्रवादीच्या नाराज झालेल्या कार्यकर्त्याने प्रदेशाध्यक्षांना लिहिले रक्ताने पत्र

पैठण : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना राष्ट्रवादीतून नाराजीचा सूर निघाला आहे. पैठण मतदारसंघातील माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण केल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

संजय वाघचौरे यांच्या एका समर्थकाने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले आहे. युवराज चावरे असं या कार्यकर्त्याचं नाव आहे.

साहेब, ज्या संजय वाघचौरे यांनी गेल्या 20 वर्षांपासून पैठण तालुक्यात राष्ट्रवादी जिवंत ठेवली त्यांनाच डावलून पक्षाने काल प्रवेश केलेल्या एकाला उमेदवारी दिली. त्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत तीव्र संतापाची लाट उमटली आहे, असं चावरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

साहेब अजुनही वेळ गेलेली नाही. लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती. अन्यथा पैठण तालुक्यात निष्क्रीय लोकांच्या हातात उमेदवारी गेल्याने पक्षाचे अस्तित्व धोक्यात येण्यास वेळ लागणार नाही, असंही चावरे आपल्या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज छाननीत संजय वाघचौरे यांनी मला ‘राष्ट्रवादी’चा अधिकृत एबी फॉर्म मिळाला म्हणत गोर्डेंच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. मात्र, वाघचौरे यांनी दाखल केलेल्या एबी फॉर्ममध्येच त्रुटी आढळल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने वाघचौरे यांचा आक्षेप फेटाळत, गोर्डे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ पक्षाच्या आक्षेपानंतर मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज सील – https://t.co/0VlWAJg4g4 @Dev_Fadnavis @NCPspeaks @INCMaharashtra

— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) October 5, 2019