उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचं ट्विट, म्हणाले…

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आहे.

सर्व राजकीय नाट्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मौन साधून होते. अखेर राज ठाकरेंनी ट्विट करत नाव न घेता उद्धव ठाकरेंना उपरोधिक टोला लगावला आहे.

ज्या दिवशी मनुष्य आपले सौभाग्य आपले वैयक्तिक कर्तव्य मानू लागतो, त्या दिवसापासून पतनाचा प्रवास सुरू होते, असं ट्विट राज ठाकरेंनी केली आहे.

राज ठाकरेंच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हे ट्विट करण्यात आलं आहे. राज ठाकरेंच्या या ट्विट अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

दरम्यान, औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव हे नामांतर करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. हा निर्णय केंद्र सरकारने घेतला पाहिजे. एवढी वर्ष केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना तुम्हाला हे का सुचलं नाही? आजचा दिवस यासाठी का निवडला?, असे थेट सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“सध्या लगोलग सगळ्यांना मंत्रिपद देणं शक्य होणार नाही, त्यामुळे…” 

शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंसह 14 आमदारांना थेट इशारा, म्हणाले… 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, वाचा संभाव्य मंत्रीमंडळ 

“स्वतःचे लोक दगाबाजी करत असताना शरद पवार उद्धव ठाकरेंच्या मागे ठामपणे उभे राहिले” 

औरंगाबादच्या नामांतरावरुन जलील आक्रमक, म्हणाले ‘या दलाल नेत्यांवर थुंका’