आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या 16 आमदारांना गोव्यात येण्याचा व्हिप?

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून यापूर्वीच संपूर्ण शिवसेना पक्ष ताब्यात घेण्याचा इरादा जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आता एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून शिवसेनेत (Shivsena) उरलेल्या 16 आमदारांना व्हिप बजावला जाण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या उर्वरित 16 आमदारांनाही व्हिप बजावून गोव्यात आणण्याची रणनीती एकनाथ शिंदे गटाने आखल्याचे समजते. या व्हिपवरून आता शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात पुन्हा एकदा कायदेशीर संघर्ष होण्याची शक्यता आहे

एकनाथ शिंदे हे काहीवेळापूर्वीच मुंबईत दाखल झाले आहेत. यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.

सागर बंगल्यावर रविंद्र चव्हाण, पराग अळवणी, मंगलप्रभात लोढा, उदयनराजे भोसले हे भाजपचे प्रमुख नेते दाखल झाले आहेत.

सर्वजण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा करतील. त्यानंतर आज संध्याकाळीच भाजप सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचं ट्विट, म्हणाले… 

“सध्या लगोलग सगळ्यांना मंत्रिपद देणं शक्य होणार नाही, त्यामुळे…” 

शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंसह 14 आमदारांना थेट इशारा, म्हणाले…