अहमदनगर | मी भाजपात प्रवेश करत असलो तरी पवारांचं ऋण कधीही विसरणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या मनगटावरून काढून, हातात भाजपाचा झेंडा घेऊ इच्छिणाऱ्या मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांना त्यांच्या अकोले मतदारसंघातील लोकांनीच मोठा धक्का दिला आहे.
अकोले तालुक्यातील आदिवासी बांधवांनी आमदार वैभव पिचड यांच्याविरोधात जनआक्रोश मोर्चा काढला आहे. पिचड यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्यामुळे पिचड यांच्या चिंता वाढल्या आहेत.
पिचड यांच्यावर आदिवासींच्या जमिनी बळकावल्याचा आरोप आहे. आदिवासी नेते अशोक भांगरे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी अकोल्यात (अहमदनगर) मोर्चा काढला.
अकोल्यात कार्यकर्ता मेळावा घेऊन वैभव पिचड यांनी आपल्या भाजप प्रवेशाची घोषणा केली. राज्यात आघाडीची सत्ता येणार नाही म्हणून भाजपात जायोत, असं स्पष्टीकरण त्यांनी राष्ट्रवादी सोडताना दिलं होतं.
मी भाजपात प्रवेश करत असलो तरी पवारांचं ऋण कधीही विसरणार नाही. पण बदलत्या काळात भाजपला लोकांची साथ मिळत आहे. त्यामुळे काळानुसार आपणही बदललं पाहिजे, असं पिचड यांनी म्हटलं होतं. पिचडांचा भाजपप्रवेश पवारांसाठी आणि एकंदर राष्ट्रवादीसाठी खूप मोठा धक्का होता.
दरम्यान, मतदारसंघातील लोकांनीच पिचड पिता-पुत्रांच्या विरोधात मोर्चा काढून पिचडांच्या अडचणी वाढवल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
वेल्हा तालुक्याचा ‘राजगड’ करा; सुप्रिया सुळेंची मागणी
-राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी का दिली???; शिवेंद्रराजे भोसले म्हणतात…
-‘राष्ट्रवादी’ला सर्वात मोठा धक्का; साताऱ्यातील राजांचा राजीनामा
-पुढच्या 15 वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येणार नाही- चंद्रकांत पाटील
-शिवेंद्रराजेंनी पवारांना अव्हेरलं; आज राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, उद्या भाजपत प्रवेश!