मुंबई | एसटी महामंडळांचं शासनात विलिनीकरण व्हावं, या मागणीसाठी एसटी कर्मचारी मागील 6 महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. सरकारने या विषयावर महत्त्वाचे निर्णय देखील घेतले.
असं असलं तरी एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर अद्याप ठाम आहेत. अशातच आता हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. एसटी महामंडळाचं विलिनीकरण शक्य नाही, असं सरकारने न्यायालयात सांगितलं आहे.
त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांनी थेट भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेत थेट नेत्यांच्या घरांना टार्गेट करण्यास सुरूवात केल्याचं पहायला मिळतंय.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे संस्थापक शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर म्हणजेच सिल्वर ओकवर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं.
एक दोन नव्हे तर शेकडो कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी घुसून आंदोलन केलं. त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी चप्पलफेक केल्याची घटना देखील घडली आहे.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी आता आंदोलन तीव्र केल्याने आता महाविकास आघाडी सरकार नमती भूमिका घेणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
थोडक्यात बातम्या –
राज ठाकरेंच्या कारवाईनंतर वसंत मोरेंना अश्रू अनावर, म्हणाले…
“दादा, कुछ तो गडबड है…”; चंद्रकांत पाटलांचा मोठा खुलासा
‘राज ठाकरे यांना अटक करा’; अबू आझमी यांची मागणी
‘निर्बंध हटवले तरी…’; राजेश टोपेंचं नागरिकांना महत्त्वाचं आवाहन
“शिवसेनेसाठी मुंबई महापालिका म्हणजे नोटा छापण्याची मशीन”