अभ्यास करायचा कंटाळा येतोय? तर या 3 टूल्सची मदत घेऊन अभ्यास करा; सहज पास व्हाल

AI Tools For Students l सध्या परीक्षांचा कालावधी सुरु होत आहे. अगदी दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच विद्यार्थ्यांची उजळणी सुरु झाली आहे. मात्र असे काही विद्यार्थी आहेत त्यांनी अजूनही अभ्यासाला सुरवात केलेली नाही. मात्र आता अशा विद्यार्थ्यांना परीक्षांचं टेंशन आल असेलच. तसेच परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा तर लागेलच.

मात्र विद्यार्थ्यांनो आता टेंशन घेऊ नका. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने तुम्ही कमी वेळेत अभ्यास करू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला परीक्षेचे खूपच टेन्शन असेल तर तुम्ही या AI टूल्सची मदत घेऊ शकता. तुम्हाला त्वरीत अभ्यासाची तयारी करण्यास मदत करेल जेणेकरून तुम्ही परीक्षा उत्तीर्ण करू शकता. तर आज आपण कोणत्या टूल्सच्या मदतीने तुम्ही अगदी कमी कालावधीत अभ्यास करू शकता हे जाणून घेऊयात… (AI Tools For Students)

AI Tools For Students l अभ्यासासाठी हे 3 AI टूल्सचा वापर करा :

1. PDF AI :

क्षेत्र कोणतेही असो पीडीएफचे महत्त्व नाकारता येत नाही. तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुमचे पेपर अगदी काही दिवसांवर आले असतील तर तुम्ही PDF AI ची मदत घेऊ शकता. pdf.ai टूल्स विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी मदत करू शकते. त्यासाठी तुम्ही AI च्या वेबसाइटला भेट द्या आणि पुस्तकाची PDF किंवा इतर अभ्यासाची माहिती अपलोड करा. यानंतर तुम्हाला पीडीएफमध्ये जे हवे ते तुम्ही मिळवू शकता. (AI Tools For Students)

AI Tools For Students l सर्वात महत्वाचं म्हणजे PDF AI तुम्हाला अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करत असते. तसेच PDF AI वर तुम्हाला महत्त्वाचे विषय आणि संकल्पना कमी वेळात मिळतात. याशिवाय उत्तरे देताना पान क्रमांक देखील मिळतो.

2. ChatGPT :

AI Tools For Students l ChatGPT हे एक लोकप्रिय AI चॅटबॉट आहे. हे जगभरात वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जाते. तसेच ChatGPT मधून अभ्यास करायचा असेल तर योग्य तो प्रॉम्प्ट द्यावा लागेल. प्रॉम्प्ट म्हणजे एक प्रकारचा प्रश्न किंवा चौकशी. तुम्ही तुमच्या वर्गातील महत्त्वाचे मुद्दे, विषय, संकल्पना, विषय ChatGPT वर विचारू शकता. याशिवाय तुम्ही तुमचे वय सांगून उत्तरे लक्षात ठेवण्याचा किंवा जाणून घेण्याचा सोपा मार्ग ChatGPT ला विचारू शकता.

3. Whiteboard.com :

AI Tools For Students l Whiteboard.com हे एक AI टूल आहे. ते तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या तयारीसाठी ऑनलाइन व्हाईटबोर्ड वापरण्यास मदत करते. या व्हाईटबोर्डवर तुम्ही महत्त्वाचे विषय आणि संकल्पना लिहू शकता, नोट्स बनवू शकता आणि फोटो काढू शकता. याशिवाय, तुम्ही हा व्हाईटबोर्ड तुमच्या मित्रांना देखील शेअर करू शकता. तुम्ही ते शेअर केल्यावर तुमची व्हाईटबोर्ड स्क्रीन तुमच्या वर्गमित्राच्या फोनवर दृश्यमान होईल. याद्वारे दोघेही मिळून तयारी करू शकतात. (AI Tools For Students)

News Title : AI Tools For Students

महत्वाच्या बातम्या –

सिद्धार्थने कियाराला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसादिवशी काय गिफ्ट दिले? अभिनेत्रीने सांगितले…

पुणे मुंबई द्रुतगती मार्ग बंद राहणार; जाणून घ्या वेळ पाहा आणि पर्यायी मार्ग

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तीला प्रेमसंबंधांमध्ये पैसे आणि भेटवस्तू मिळण्याची शक्यता

आता जबरदस्त आवाजात गाणे ऐकता येणार! Redmi Buds 5 लाँच

पुण्यात ‘डासांचे वावटळ’, सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ पाहून पुणेकर थक्क