एअर इंडियाच्या विमानाला केरळमध्ये भीषण अपघात; विमानाचे झाले दोन तुकडे

तिरूअनंतपूरम | केरळमधील कोझिकोड येथील विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात त्या विमानाचे अक्षरक्ष: दोन तुकडे झाले.

एअर इंडियाचं हे विमान IX1344 क्रामांकाचं आहे. या विमानाने दुबईहून आज 7 ऑगस्ट संध्याकाळी 4 वाजून 45 मिनिटांनी उड्डाण घेतलं होतं. मात्र, संध्याकाळी 7 वाजून 41 मिनिटांवर रनवेवर लँडिंग दरम्यान हे विमान रननेवरुन घसरलं. ही दुर्घटना कोझिकोड एअरपोर्टवर संध्याकाळी पाऊणे आठ वाजताच्या सुमारास घडली. एअर इंडिया एक्सप्रेसच्या माहितीनुसार, विमानात दोन वैमानकांसह सहा क्रू मेंबर होते.

मुसळधार पावासामुळे रनवे जलमय झालं असल्याची माहिती समजत आहे. त्यामुळेच रनवेवरुन विमान घसरलं आणि 30 फूट खोल खाडीत जाऊन पडलं. या दुर्घटनेत विमानाचे दोन तुकडे झाले आहेत. आत्तापर्यंत समजू शकलेल्या माहितीनुसार या अपघातात वैमानिक दीपक वसंत साठे यांचा मृत्यु झाला आहे. वैमानिकासह 14 जणांचा मृत्यू झाला असून 4 गंभीर जखमी झाले आहेत तर 172 जणांना रूग्णलयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती समजत आहे.

दरम्यान,  घटनास्थळी बचाव पथक पोहोचलं आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या विमानात एकूण 191 प्रवासी होते.

बातमी अपडेट होत आहे…..

 

महत्वाच्या बातम्या-

सुशांत सिंहची हत्या झाली असेल तर मग…; रोहित पवारांनी भाजपला सुनावलं

खासगी रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला बसणार चाप; राज्य सरकारकडून भरारी पथकं तैनात!

“भाजप महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक आहे”

सुशांतच्या चौकशीसाठी आलेले एसपी विनय तिवारी बिहारला रवाना; मुंबई महापालिकेवर केला ‘हा’ गंभीर आरोप!

“1999 साली झालेल्या कारगील युद्धात मला लढायचं होतं, मला गुरांचा चारा खावा लागला तरी चालेल पण…”