चांगली बातमी! अवघ्या ‘इतक्या’ रूपयात कोरोनाची लस होणार उपलब्ध!

पुणे | सिरम इन्स्टिट्यूटच्या लस उत्पादनासंदर्भात एक महत्त्वपूर्ण करार झाला आहे. त्यामुळे आता सिरमची कोरोना लस साधारण 250 रुपयांना उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाउंडेशनबरोबर महत्त्वपूर्ण करार झाला. या करारानुसार बिल गेट फाउंडेशन सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तब्बल 150 मिलियन डॉलर गुंतवणूक करणार आहे. या माध्यमातून सिरम इन्स्टिट्यूट तब्बल 100 मिलियन डोस तयार करणार आहे.

भारतासह इतर देशांमधील गरीबांना कोरोनाची लस उपलब्ध करून देण्यासाठी सिरम इंस्टीट्युट आणि बिल व मेलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्यात करार झाला आहे. या करारानुसार गरीबांसाठी कोरोनावरील दहा कोटी लस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

दरम्यान, जगातील दानशूर व्यक्तींमध्ये समावेश असलेल्या बिल गेट्स यांनीही आपल्या बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्यावतीने कोरोनाविरोधातील लढाईत गोरगरीबांना लस उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल उचललं आहे. बिल गेट्स यांच्या या संस्थेने सीरम इंस्टीट्युटसोबत कोरोनावरील लसीसाठी मोठा करार केला असून, या करारामुळे गरीबांना कोरोनावरील लस उपलब्ध होणे शक्य होणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

एअर इंडियाच्या विमानाला केरळमध्ये भीषण अपघात; विमानाचे झाले दोन तुकडे

सुशांत सिंहची हत्या झाली असेल तर मग…; रोहित पवारांनी भाजपला सुनावलंॉ

खासगी रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला बसणार चाप; राज्य सरकारकडून भरारी पथकं तैनात!

“भाजप महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक आहे”

सुशांतच्या चौकशीसाठी आलेले एसपी विनय तिवारी बिहारला रवाना; मुंबई महापालिकेवर केला ‘हा’ गंभीर आरोप!