एअरटेलच्या ग्राहकांसाठी खुशखबर; केली ‘ही’ मोठी घोषणा!

मुंबई | ग्राहकांची वाढती नाराजी लक्षात घेत एअरटेलने  फेअर युसेज पॉलीसी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. विविध कंपन्यानी आपले टॅरिफ प्लॅनमध्ये 40 ते 45 टक्क्यांची नुकतीच वाढ केली होती. मात्र एअरटेल कंपनीने वाढत्या स्पर्धेत ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

एअरटेल कंपनीने आपल्या ट्वीटर हँडलवरून याबाबत माहीती दिली. शनिवारपासून भारतात कोणत्याही मोबाईल नेटवर्कवर अनलिमिटेड प्लॅनचा वापर करणाऱ्या ग्राहकांना अनलिमिटेड कॉल करता येतील. यासाठी कोणतीही अट नाही, असं कंपनीने म्हटलं आहे.

एअरटेलनं रिलायन्स जिओप्रमाणेच ठराविक कॉलची मर्यादा ओलांडल्यानंतर आययूसी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. फेअर युसेज पॉलिसीची मर्यादा ओलांडल्यानंतर ग्राहकांकडून 6 पैसै प्रती मिनिट दर आकारण्याचा निर्णय घेतला होता. पण कंपनीने आपला हा निर्णय मागे घेतला आहे.

जिओसह अन्य कंपन्यानी केवळ आपल्या नेटवर्कवरच अनलिमिटेड कॉल देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ग्राहकांच्या नाराजीला प्रतिसाद देत एअरटेलनं त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-