तावरे गुरु-शिष्याचा पराभव करत अजित पवारांनी माळेगावचा गड आणला खेचून

बारामती |  बारामतीतीतल माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चर्चेत राहिली होती. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधी प‌ॅनलच्या तावरे गुरु-शिष्याला शह देत माळेगावची सत्ता खेचून आणली.

साखर कारखान्याची निवडणुक  पवारांची प्रतिष्ठेची समजली जाणारी होती. कारखान्याच्या 21 पैकी 18 जागांवर राष्ट्रवादीची विजयी घोडदौड सुरू आहे. फक्त तीन जागा सत्ताधारी गटाच्या सहकार पॅनेलला आतापर्यंत मिळाल्या आहेत.

माळेगावच्या यशाचे खरे शिल्पकार अजित पवार असल्याची प्रतिक्रीया राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर व गटनेते सचिन सातव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी गेली अनेक वर्ष बारामतीवर आपली एकहाती सत्ता ठेवली. मात्र माळेगाव कारखान्याचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे त्यांनी यावेळी फिल्डिंग लावत अनेरकांशी वैयक्तिक संपर्क साधत सत्ता खेचुन आणली.

महत्वाच्या बातम्या-

-सर्वांच लक्ष वेधून घेणारी ट्रम्प यांच्यासोबत असणारी ‘ती’ महिला नक्की आहे तरी कोण?

-अजित पवारांनी आपला ‘तो’ शब्द खरा करुन दाखवला!

-CAA वरुन राजधानी पेटली; पोलिसासह 5 जणांनी जीव गमावला

-संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक सल्ला म्हणतात…

-ट्रम्प यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अशोक चव्हाण म्हणतात…