उपमुख्यमंत्री अजित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला, म्हणाले…

पुणे | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आलेल्या नोटिशीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

नोटीशी देण्याची पद्धत राज्यात नव्हती. पण जबाबदार व्यक्तीनेही बोलताना भान बाळगलं पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

नोटीसा देण्याची परिस्थिती कधीही नव्हती. या संदर्भात वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करणं योग्य नाही. मी पंतप्रधानांसमोर याबाबत थोडंबहुत वक्तव्य केलं होतं. प्रत्येकानं आपआपलं काम करावं, असा सल्ला अजित पवारांनी यावेळी दिला.

जनतेने ज्यांना पाठिंबा दिला आहे, लोकशाहीत जनता ज्यांच्या पाठिशी असेल त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं असं माझं मत आहे, असं अजित पवार म्हणाले.

यशवंतराव चव्हाणांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पदावरील व्यक्तीने कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं काम केलं पाहिजे, कसं सर्वांना घेऊन गेलं पाहिजे याचा आदर्श घालून दिला आहे. हे सर्व स्तरावर झालं पाहिजे. लोकांना एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप ऐकण्यात अजितबात रस नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं.

दरम्यान आज उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात बारा तासांचा मॅरेथॉन दौरा करत आहेत. या बारा तासात ते 17 ठिकाणी जातील आणि 31 प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत.

पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या कार्यकाळाची मुदत संपत 14 मार्च रोजी संपत असल्यामुळे एकाच दिवशी कार्यकर्त्यांना उद्घाटनासाठी वेळ देत सकाळी 7 पासून उद्घाटनाचा धडाका सुरू केला आहे. मुदत संपल्यावर परत उद्घाटन करता येणार नसल्याने अजित पवारांचा उद्घाटनाचा मॅरेथॉन दौरा आयोजित करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

राणे बंधूंना मोठा झटका; शरद पवारांच्या विरोधातील वादग्रस्त वक्तव्य भोवणार 

“काही लोक आता जेलमध्ये सकाळच्या पत्रकार परिषदेची परवानगी मागतील” 

“नरेंद्र मोदींच्या तुलनेचा नेता आज लोकांसमोर नाही” 

पुरूषांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; ‘या’ सवयी करतील मोठं नुकसान 

“सातारकरांनी पाच वर्षापूर्वीच घाण फेकून दिली”