“राष्ट्रवादीचे सर्वच नेते भ्रष्टाचाराने माखलेले, सगळे जेलमध्ये जाणार”

मुंबई | सरकारमधील पोलिसांच्या बदल्यांची गोपनीय माहिती उघड करण्यात आली. या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. यावर भाजप नेते अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना बोंडे यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केलीये.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख कैदेत आहेत. नबाब मलिकही जेलमध्ये पाहुणचार खात आहेत. आता अनिल परब यांना नंबर लवकरच येऊ शकतो. टरबुजा हुआ लाल अब सब सडेंगे सालोसाल, असं म्हणत बोडेंनी सरकारवरील मंत्र्यांवर निशाणा साधला.

राष्ट्रवादीचे बहुतेक सर्व नेते भ्रष्टाचाराने माखले आहेत. ते सर्व आता जेलमध्ये जाणार. त्यांची चंपी होणार, असंही भाकित अनिल बोंडे यांनी वर्तवलं आहे.

गैरव्यवहार करणाऱ्यांना सळो की पळो करून फडणीवस यांनी सोडले आहे. त्यामुळं फडणवीस यांना ही नोटीस पाठविण्यात आली आहे. या घटनेचा विरोध करण्यासाठी आम्ही आम्ही एसपी ऑफिसमध्ये काळे फित लावून विरोध करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.

डणवीस यांच्यावर एक तरी आरोप खरा करून दाखवा. ज्यांनी भ्रष्टाचार केला ते राज्यात अराजक माजविण्याचं काम तीनही पक्ष करत आहेत, असा आरोप अनिल बोंडे यांनी केलाय.

राज्य सरकारमधील काही मंत्र्यांची टरकली आहे. या सर्व प्रकरणांमुळं देवेंद्र फडणवीस यांचे तोंड कसे बंद करता येईल, यासाठी ही नोटीस पाठविली असल्याचं अनिल बोंडे यांनी नागपुरात सांगितलं.

दरम्यान, माझ्या माहितीचा स्त्रोत सांगणे मला बंधनकारक नाही. ऑफिशियल सिक्रेट अॅक्टनुसार राज्य सरकारनं गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सरकारी वकिलांचे बिंग फोडणार असल्याचंही फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या- 

“काही लोक आता जेलमध्ये सकाळच्या पत्रकार परिषदेची परवानगी मागतील” 

“नरेंद्र मोदींच्या तुलनेचा नेता आज लोकांसमोर नाही” 

पुरूषांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; ‘या’ सवयी करतील मोठं नुकसान 

“सातारकरांनी पाच वर्षापूर्वीच घाण फेकून दिली” 

“राज्यपाल सावित्रीबाईंची थट्टा करत असतील तर आमचं रक्त थंड झालंय का?”