राज्यपालांच्या ‘त्या’ मिश्किल वाक्यानंतर अजित पवारांचा राज्यपालांना दंडवत

पुणे | आज स्वातंत्र्य दिनानिमित्त पुणे जिल्ह्याचे शासकीय ध्वजारोहण महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पार पडलं. आज सकाळी भगतसिंग कोश्यारी पुण्यात दाखल झाले होते. त्यानंतर 9 वाजून 5 मिनिटांनी राज्यपालांच्या हस्ते मोठ्या उत्साहाने झेंडावंदन झालं.

ध्वजारोहनासाठी कार्यक्रमस्थळी येताना राज्यपालांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी समोरासमोर भेट झाली. यावेळी “आपके राज्य मे हम बिना आपके परमिशन आ गये”, असा मिश्किल डायलॉग कोश्यारींनी पवारांना सुनवला.

राज्यपालांच्या या वाक्यानंतर अजित पवारांनी हसत भगतसिंग कोश्यारींना दंडवत घातला. राज्यपाल आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील ही शाब्दिक टोलेबाजी चांगलीच रंगल्याने उपस्थितांच्या चेहऱ्यावरसुद्धा स्मितहास्य उमटलं.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार यांनी भल्या पहाटे भगतसिंग कोश्यारिंच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यावेळी अजित पवार आणि भगतसिंग कोश्यारी यांचे चांगलेच सूर जुळले होते.

महत्वाच्या बातम्या-

कोथिंबिरीचे ‘हे’ फायदे वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

कंगना रनौतनं उलगडलं बॉलीवूड इंडस्ट्री आणि उंडरवर्ल्ड मधील नात्याचं गूढ

अखेर उच्च न्यायालयाचा ग्रामपंचायत प्रशासकाबाबत मोठा निर्णय; राज्य सरकारला झटका!

स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर नरेंद्र मोदींनी देशवासियांसाठी लाल किल्ल्यावरून केल्या मोठ्या घोषणा

ठाकरे सरकरामधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण; शरद पवारांच्या बैठकील होते हजर