स्वातंत्र्यदिनादिवशी नक्की पाहावेत हे बॉलिवूड चित्रपट; जाणून घ्या!

मुंबई | कोरोना संक्रमणामुळे ध्वजारोहण करता येत नसला तरी आज 74 व्या स्वातंत्र्यदिना दिवशी जवानांंना सलामी देऊ शकतो. त्यांना स्मरण करत त्यांच्या जीवनावर आधारित काही बॉलीवुड चित्रपट घरी बसल्या पाहू शकतो. काही चित्रपट आहेत त्याची आपण माहिती जाणून घेणार आहोत.

मेघना गुलजार निर्मिती ‘राझी’ हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्धावर आधारित हा चित्रपट आहे. आपल्या देशापुढे आणि कर्तव्यापुढे कोणत्याही गोष्टीना महत्त्व न देणाऱ्या धाडसी मुलीची ही कथा आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि विकी कौशलने दमदार परफॉर्मन्स दिला आहे.

मागील वर्षी सुपरहिट ठरलेला उरी-द-सर्जिकल स्ट्राईक या सिनेमाची निर्मिती आदित्य धर यांनी केली. 18 सप्टेंबर 2016 रोजी जम्मूच्या बारामुल्ला येथे भारतीय सैन्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 29 सप्टेंबरला भारतीय सैन्याने पाकिस्तानी काश्मीर मध्ये हल्ला करत त्यांना प्रतिउत्तर देऊन विजयी मिळवला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या विकी कौशलला या साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हा सिनेमा पाहताना सैन्यदलाविषयीचा असलेला आदर अजून उंचावणार यात काही शंका नाही.

दरम्यान, 26 जानेवारी 2006 ला रिलीज झालेला रंग दे बसंती हा चित्रपट आज सुद्धा लोकप्रिय आहे. आमिर खान, शमरण जोशी, कुणाल कपूर, सिद्धार्थ, आर. माधवन या कलाकारांची प्रमुख भूमिका असून आजचे युवा देशप्रेमा करीता कसे शाहिद होतात हे या कथेत सांगितलं आहे. बाटला हाऊस हा जॉन अब्राहम चा चित्रपट 2019 मध्ये आला होता.13 सप्टेंबर 2008 साली दिल्लीमध्ये झालेल्या मोठ्या बॉम्बस्फोटा नंतर बदला घेण्यासाठी बाटला हाऊस एन्काऊंटर करण्यात आलं . या सिनेमातून जवानांचा देशभक्ती आणि त्याग पाहायला मिळेल.

महत्वाच्या बातम्या-

टोमॅटो खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का?; वाचा सविस्तर

स्वातंत्र्य दिनानिमित्त जिओची मोठी ऑफर 5 महिने फ्री कॉलिंग, फ्री इंटरनेट; जाणून घ्या!

‘तुमच्या प्रार्थनेमुळे, आशिर्वादामुळे मी मरता मरता वाचले’; आयसीयून बाहेर पडल्या पडल्या नवनीत राणांचा पहिला व्हिडीओ

कोथिंबिरीचे ‘हे’ फायदे वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

कंगना रनौतनं उलगडलं बॉलीवूड इंडस्ट्री आणि उंडरवर्ल्ड मधील नात्याचं गूढ