“येणाऱ्या निवडणुकीत कोणात किती कौशल्य समजेल”

पुणे | माणूस अनुभवातून शहाणा होतो. येणाऱ्या निवडणुकीत कोणात किती कौशल्य आहे समजेल, असं थेट आव्हानच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिलंय.

अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. बारामती येथे आज सायन्स ॲण्ड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटरचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पुण्यात माध्यमांशी बोलताना पहिल्यांदाच अजित पवार यांनी राज्यसभा निवडणुकीवर भाष्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला आव्हान दिलं आहे.

ज्याच्या बाजूने निकाल लागतो, त्याचं कौशल्य समजलं जातं, ज्यांचा पराभव होतो, ते कमी पडले असं समजलं जातं. त्यामुळे विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर कुणाकडे कौशल्य आहे आणि कुणाकडं नाही हे जनतेला कळेल, असं अजित पवारांनी म्हटलंय.

दरम्यान, पत्रकारांनी अजित पवार यांना विखेंच्या ऑफरवर प्रश्न विचारला. यावेळी ‘मस्त चाललंय आमचं’ एवढ्या तीन शब्दांत विखेंनी उत्तर दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मनसे नेते वसंत मोरेंच्या मुलाला धमकी; ‘त्या’ चिठ्ठीने पुण्यात खळबळ 

“राष्ट्रपती पदासाठी उंची लागते, शरद पवार तर…”

देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 2024च्या लोकसभा निवडणुकांसाठी रणनीती, म्हणाले… 

राज्यात मान्सून बरसणार, ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा जारी

सावधान! राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आजही लक्षणीय वाढ, वाचा आकडेवारी